राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकार म्हणतं, आमची काही चूक नाही!
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या एकूण वादाबाबत आता राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना ऐनवेळी शासकीय विमानातून प्रवासासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राजभवनातील अधिकाऱ्यांनी योग्य संवाद न साधल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. पाहा […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या एकूण वादाबाबत आता राज्य सरकारने देखील आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना ऐनवेळी शासकीय विमानातून प्रवासासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राजभवनातील अधिकाऱ्यांनी योग्य संवाद न साधल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.
पाहा राज्य सरकारने नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे.
‘राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही.’
‘राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.’