धक्कादायक! गर्भवती पत्नीला जिवंत जाळलं, अर्भकाचा मृत्यू
कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कळवा भागात घडला आहे. या घटनेत महिलेच्या पोटातील ६ महिन्याच्या अर्भकाचा दुर्दैवी अंत झाला असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. जे.जे. रुग्णालयात सध्या या महिलेवर उपचार सुरु असून कळवा पोलिसांनी आरोपी पती अनिल चौरसियाला अटक केली आहे. कळव्याच्या मफतलाल कॉलनीमध्ये ही घटना घडली. अनिल […]
ADVERTISEMENT

कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील कळवा भागात घडला आहे. या घटनेत महिलेच्या पोटातील ६ महिन्याच्या अर्भकाचा दुर्दैवी अंत झाला असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. जे.जे. रुग्णालयात सध्या या महिलेवर उपचार सुरु असून कळवा पोलिसांनी आरोपी पती अनिल चौरसियाला अटक केली आहे. कळव्याच्या मफतलाल कॉलनीमध्ये ही घटना घडली.
अनिल चौरसिया हा कळव्यातील मफतलाल कॉलनीत आपल्या पहिल्या पत्नीसोबत रहायचा. काही महिन्यांपूर्वी अनिलचे डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध तयार झाले. मे महिन्यात अनिलची पहिली पत्नी शोभावतीला याबद्दल माहिती समजताच दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असायचे.
३० ऑक्टोबरला दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की अनिलने पहिल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. या घटनेत अनिलच्या पत्नीच्या गर्भात असलेल्या ६ महिन्याच्या अर्भकाचा मृत्यू झाला असून पत्नीची तब्येतही नाजूक आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.