UPS Calculation: ६०,७०,८० हजार बेसिक सॅलरी मिळतेय? तर किती मिळणार पेन्शन? UPS चं गणित समजून घ्या
Unified Pension Scheme Latest News : केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) ची घोषणा केल्यानंतर लोकांची याबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आता निवृत्त झाल्यानंतर यूपीएसच्या माध्यमातून किती पेन्शन मिळेल, याबाबतही लोकांना माहिती जाणून घ्यायची आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
निवृत्त कर्मचाऱ्यांना किती रुपये पेन्शन मिळणार?
UPS चं पेन्शनचं गणित माहितीय का?
UPS च्या पेन्शनच्या रक्कमेबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
Unified Pension Scheme Latest News : केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) ची घोषणा केल्यानंतर लोकांची याबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आता निवृत्त झाल्यानंतर यूपीएसच्या माध्यमातून किती पेन्शन मिळेल, याबाबतही लोकांना माहिती जाणून घ्यायची आहे. आम्ही तुम्हाला बेसिक सॅलरीचं गणित सांगणार आहोत. जर बेसिक सॅलरी ६०,७० आणि ८० हजार असेल, तर किती पेन्श मिळणार? या योजनेत कोणत्या नियम व अटी लागू आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.(After the announcement of the Unified Pension Scheme (UPS) by the central government, people's curiosity to know about it has increased. Now how much pension will be received through UPS after retirement)
ADVERTISEMENT
निवृत्त कर्मचाऱ्यांना किती रुपये पेन्शन मिळणार?
जर कर्मचाऱ्यांनी २५ वर्षांपर्यंत नोकरी पूर्ण केली असेल, तर त्यांना पेन्शनची रक्कम १२ महिन्यांच्या बेसिक सॅलरीच्या ५० टक्के दिली जाईल. तर फॅमिली पेन्शन-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचं ६० टक्के दिलं जाईल. जर कर्मचाऱ्याने १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी केली असेल, तर त्यांना मिनिमम पेन्शनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये दिले जातील. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून सरकार १८.४ टक्के योगदान देणार आहे. तर कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी + डीए मिळून १० टक्के योगदान द्यावं लागेल. याच्या आधारे यूपीएसच्या माध्यमातून पेन्शन दिली जाईल.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार! IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
६०,००० रुपये बेसिक सॅलरीवर किती पेन्शन?
जर तुमची १२ महिन्यांची बेसिक सॅलरी ६० हजार रुपये असेल, तर निवृत्तीनंतर युपीएसच्या माध्यमातून ३० हजार रुपये (डीआर मिळवून) पेन्शन दिलं जाईल. तर कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाला १८,००० रुपये (डीआर जोडून) दिलं जाईल.
हे वाचलं का?
1) ६० हजार सॅलरीवर पेन्शन = ६० हजार रुपयांचं ५० % + डीआर = ३०,००० रुपये + डीआर
2) ३० हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन = ३०,००० रुपयांचं ६० % + डीआर = १८००० रुपये + डीआर
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : कॉंग्रेसला मोठा धक्का! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन
७०,००० रुपये बेसिक सॅलरीवर पेन्शन
जर एखाद्या कर्मचाऱ्याची १२ महिन्यांची बेसिक सॅलरी ७० हजार रुपये आहे आणि त्याने कमीत कमी २५ वर्षांपर्यंत नोकरी केली असेल, तर निवृत्तीनंतर UPS च्या माध्यमातून अशाप्रकारे पेन्शन मिळेल.
ADVERTISEMENT
1) ७० हजार सॅलरीवर पेन्शन = ७०,००० रुपयांचं ५०% + डीआर = ३५००० रुपये + डीआर
2) ३५ हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन = ३५००० रुपयांचं ६०% + डीआर = २१००० रुपये + डीआर
ADVERTISEMENT
८० हजार बेसिक सॅलरीवर किती मिळेल पेन्शन?
जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची १२ महिन्यांची सरासरी बेसिक सॅलरी ८०००० रुपये आहे आणि त्याने कमीत कमी २५ वर्ष नोकरी केली असेल, तर त्याला यूपीएच्या माध्यमातून इतकी पेन्शन मिळेल.
1) ८० हजार सॅलरीवर पेन्शन = ८०००० रुपयांचं ५० % डीआर = ४०,००० रुपये + डीआर
2) ४० हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन = ४०,००० रुपयांचं ६० % + डीआर = २४००० रुपये + डीआर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT