दारूची खुलेआम विक्री होणार असेल तर गांजाच्या शेतीलाही संमती द्या-संभाजी भिडे
स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी लोकशाही जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संघटना करण्याचं स्वातंत्र्य आणखी दहा प्रकारची स्वातंत्र्य असतील. महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य उपभोगलं आहे. गुरूवारी एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकलं आहे. काय कारण असेल ते भगवंताला ठाऊक, पण सांगितलं जातं की विकास, सुधारणा आणि प्रगतीसाठी राज्याची अर्थसत्ता बलवान पाहिजे. त्यामुळे ज्यातून महसूल खूप मिळतो असं सुधारणेचं […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी
लोकशाही जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संघटना करण्याचं स्वातंत्र्य आणखी दहा प्रकारची स्वातंत्र्य असतील. महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य उपभोगलं आहे. गुरूवारी एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकलं आहे. काय कारण असेल ते भगवंताला ठाऊक, पण सांगितलं जातं की विकास, सुधारणा आणि प्रगतीसाठी राज्याची अर्थसत्ता बलवान पाहिजे. त्यामुळे ज्यातून महसूल खूप मिळतो असं सुधारणेचं पाऊल महाराष्ट्र शासनाने टाकून फार मोठं प्रगतीचं काम केलं आहे. ते काम भविष्यात या देशाला पशूपण देणारं आहे. राष्ट्राला राष्ट्र म्हणून टीकण्यासाठी काही उदात्त, पवित्र विचारांचं आणि आचारांचं अधिष्ठान असावं लागतं. अशा शब्दात वाईन किराणा मालाच्या दुकानात मिळण्याच्या निर्णयावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खोचक टीका केली आहे.
एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल प्रगतीच्या दिशेने असलं पाहिजे. मात्र महाराष्ट्र सरकारचा निर्णय म्हणजे सर्वनाशाकडे पडलेलं पाऊल आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दारूबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावरून घणाघाती टीका केली. या देशातली दारू संपली पाहिजे. दारूला अशा प्रकारे संमती देत असाल तर गांजाची शेती करायलाही अडवू नका असाही खोच सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. अफू, गांजा याचीही शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारात पैसा मिळवू शकेल असंही हरकत नाही म्हणणारा बेशरम समाज उत्पन्न होतो आहे अशीही टीका त्यांनी केली.