नागपुरात तापमानात वाढ झाल्याने बिबट्या आणि अस्वलाच्या पिंजऱ्यात लावण्यात आले कुलर
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर मार्च अजून उलटला नाही तोच सूर्याने आपली प्रखरता दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कुलर , एसी लावतो.. आपण घराच्या बाहेर पडत नाही. तिथे प्राण्यांचं काय? नैसर्गिक अधिवासातील प्राणी त्यांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था करीत असतात. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा काय ती त्यांना करून द्यावी लागते. ऊन्हाचे चटके बसायला सुरवात झाली आहे. […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
मार्च अजून उलटला नाही तोच सूर्याने आपली प्रखरता दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण कुलर , एसी लावतो.. आपण घराच्या बाहेर पडत नाही. तिथे प्राण्यांचं काय? नैसर्गिक अधिवासातील प्राणी त्यांच्या सोयीप्रमाणे व्यवस्था करीत असतात. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचा काय ती त्यांना करून द्यावी लागते. ऊन्हाचे चटके बसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालय मध्ये प्राण्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी कुलर लावण्यात आलेले आहे, त्यासोबतच इतर व्यवस्थाही करण्यात आली आहे .
नागपूर मध्ये सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनी उन्हापासून बचावासाठी थंड पेय पिणे ,उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडणे सुरू केलं आहे.
मग या जंगलच्या राजाला पण उन्हाचे चटके लागणार , त्यामुळेच या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील या मोकळ्या जागेत असणारे वाघ आणि वाघीण या त्याच्या आजूबाजूला खेळत आहेत आणि सावली धरून बसले आहेत जेणेकरून उन्हाचे चटके त्यांना लागू नये तर पिंजऱ्यामध्ये हा मात्र सिमेंटच्या असल्यामुळे त्याचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहाल कुलर लावले आहे… या प्राणिसंग्रहालय अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाघ आणि बिबटे..या सगळ्यांची देखभाल प्राणी संरक्षण करतात ..पण उन्हात जरा जास्त काळजी घ्यावी लागते.