स्वतःच्या हाताने विषारी इंजेक्शन घेत महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपुरातील धक्कादायक प्रकार
नागपुरात एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. आकांक्षा मेश्राम असं या डॉक्टरचं नाव असून त्या नागसेन भागात राहत होत्या. आकांक्षा यांचं MD पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं. नागपुरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपलं वैद्यकीय शिक्षण झाल्यानंत २०१७ साली डॉ. […]
ADVERTISEMENT
नागपुरात एका महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन घेत स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. आकांक्षा मेश्राम असं या डॉक्टरचं नाव असून त्या नागसेन भागात राहत होत्या. आकांक्षा यांचं MD पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं. नागपुरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
आपलं वैद्यकीय शिक्षण झाल्यानंत २०१७ साली डॉ. आकांक्षा यांचं लग्न झालं. परंतू यानंतर वैवाहीक जिवनात वितुष्ट आल्यामुळे पती-पत्नी विभक्त झाले. डॉ. आकांक्षा सोलापूरमधील रुग्णालयात सरकारी नोकरीवर होत्या. परंतू कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्या नागपूरला आई-वडिलांकडे रहायला आल्या. गुरुवारी रात्री आकांक्षा यांनी विषारी इंजेक्शन घेतल्याचं कळतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागसेन भागातील आपल्या वडिलांच्या घरात वरच्या मजल्यावर आकांक्षा राहत होत्या. गुरुवारी रात्री ९ वाजले तरीही मुलीची हालचाल ऐकू येत नाही म्हणून आई-वडील आकांक्षा यांच्या रुमवर गेले असला त्यांना आकांक्षा बेडवर बेशुद्धअवस्थेत आढळल्या. त्यांच्या बाजूला चार-पाच सिरींज सापडल्या, ज्यातील दोन सिरींज रिकाम्या होत्या.
हे वाचलं का?
आई-बाबांनी तात्काळ डॉक्टरांना फोन करुन बोलावून घेतलं. यावेळी डॉक्टरांनी तपासून आकांक्षा यांना मृत घोषित केलं. जरीपटका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. डॉ. आकांक्षा यांनी लिहीलेली एक सुसाईट नोट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली असून त्या आधारावर पुढील तपास होणार आहे. नैराश्यातून आकांक्षा यांनी हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Nashik Crime : दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT