महाराष्ट्रातील एक गाव जिथे हनुमानाची पूजा करणं दूर, ‘मारूती’ची गाडीही घेतली जात नाही
–रोहित वाळके, अहमदनगर गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर राज्यात हनुमान चालीसा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं आहे, पण महाराष्ट्रात एक गाव आहे, जिथे हनुमानाची पुजा केली जात नाही. इतकंच काय तर या गावात मुलांची नावंही हनुमान किंवा मारूती अशी ठेवली जात नाही. महाराष्ट्रातील हे गाव आहे अहमदनगर […]
ADVERTISEMENT

–रोहित वाळके, अहमदनगर
गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर राज्यात हनुमान चालीसा चर्चेच्या केंद्रस्थानी आली. भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून मशिदींबाहेर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं आहे, पण महाराष्ट्रात एक गाव आहे, जिथे हनुमानाची पुजा केली जात नाही. इतकंच काय तर या गावात मुलांची नावंही हनुमान किंवा मारूती अशी ठेवली जात नाही.
महाराष्ट्रातील हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात. गावाचं नाव दैत्यनांदुर. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७० किमी अंतरावर असलेल्या दैत्यनांदूरमध्ये हनुमानाची पूजा का केली जात नसेल? असा प्रश्न पडला. त्याचा शोध घेताना ‘मुंबई Tak’च्या टीमला गावाबद्दलची एक कहाणी ऐकायला मिळाली.