Maharashtra HSC Result 2023: 12 वीचा निकाल जाहीर, तुमचा विभाग कितवा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra board 12th result 2023 has been declared overall result of the state is 91.25 percent
maharashtra board 12th result 2023 has been declared overall result of the state is 91.25 percent
social share
google news

Maharashtra HSC Result 2023: पुणे: Maharashtra HSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2023 चा निकाल आज (25 मे 2023) रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात बारावीच्या परीक्षेचा एकूण निकाल हा 91.25 टक्के एवढा लागला आहे. (Maharashtra HSC result 2023) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 2.97 टक्क्यांची घट झाली आहे. एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 1 लाख 23 हजार 903 विद्यार्थी हे नापास झाले आहेत. (maharashtra board 12th result 2023 has been declared overall result of the state is 91.25 percent)

ADVERTISEMENT

दरम्यान, यंदाचा निकालात नेहमीप्रमाणेच कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल हा 96.01 टक्के एवढा लागला आहे. तर त्या पाठोपाठ पुणे आणि कोल्हापूर विभागाचा नंबर लागलाय. पुण्याचा निकाल 93.34 टक्के तर कोल्हापूरचा निकाल 93.28 टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा 88.13 टक्के इतका लागला आहे.

हे ही वाचा >> Bacchu Kadu यांचं मंत्रिपद गेलं? शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

HSC Result 2023: विभागानुसार निकाल

  • कोकण – 96.01 टक्के
  • पुणे – 93.34 टक्के
  • कोल्हापूर – 93.28 टक्के
  • अमरावती – 92.75 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
  • नाशिक – 91.66 टक्के
  • लातूर – 90.37 टक्के
  • नागपूर – 90.35 टक्के
  • मुबंई – 88.13 टक्के

बारावीच्या निकालात मुलींची बाजी

बारावीच्या निकालात यंदाही नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी राज्यात मुलींचा निकाल हा 93.73 टक्के लागला असून मुलांचा निकाल हा 89.14 टक्के इतका लागला आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> सांगलीत क्रूरतेचा कळस! …अन् त्याने बापालाच ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

12वी निकालाची तारीख, वेळ (Maharashtra HSC Result 2023 Date and Time)

महाराष्ट्र एचएससी निकाल 2023 Maharashtra HSC Result 2023– 25 मे 2021 (गुरूवार) दुपारी 2:00 वाजता

नेमका निकाल कसा पाहता येणार?

  1. सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
  2. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  3. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो रोल नंबर देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
  4. त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना Submit हे बटण दाबावं लागणार आहे.
  5. समजा, तुमचा सीट नंबर M857412 असेल आणि तुमच्या आईचे नाव राधिका असं असेल तर तुम्ही M857412 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RAD असं टाकावं लागेल.
  6. त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT