कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्राची काळजी वाढवणारी बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात एक दिवसात रूग्णसंख्या वाढली आहे. ८ हजार ८०७ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर ८० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राची काळजी वाढवणारीच ही बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यातील संख्या जाहीर केली आहे.

चोवीस तासांमध्ये ८ हजार ८०७ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर २ हजार ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख ४१ हजार ७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २१ हजार ११९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ हजार ४४६ रूग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात आज घडीला ५९ हजार ३५८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या २१ लाख २१ हजार ११९ इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही बातमी वाचलीत का? टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं ठरत आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट

आज नोंद झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. तर उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू नागपूर-११, ठाणे-९, औरंगाबाद-४, अमरावती-१, चंद्रपूर-१, जळगाव-१, नाशिक-१, वर्धा-१, पुणे-१ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT