लालपरी आहेच भारी… काय आहे एसटीचा नेमका इतिहास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पहिली एसटी बस ही 1 जून 1948 साली सुरु झाली. जी सुरुवातीला निळ्या रंगाची होती. जी नगर-पुणे-नगर मार्गावर धावली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एसटीच्या कार्यशाळेत बांधलेली पहिली बस – 1950 साली लेलँड कंपनीच्या सांगाड्यावर मुंबईतील एसटीच्या स्वत:च्या कार्यशाळेत पहिली बस बांधण्यात आली होती.

ADVERTISEMENT

पहिली आराम बस – 1950 साली मॉरिश कमर्शियल कंपनीच्या बस या एसटी बसच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. ज्या निलकमल आणि गिर्यारोहण नावाने ओळखल्या जात होत्या.

ADVERTISEMENT

पहिली लाल पिवळी बस – 1960 साली दोपोडी कार्यशाळेने टाटा मर्सडीज बेंझसारखीच एसटी बस तयार केली होती. ज्या बसला पहिल्यांदा लाल आणि पिवळा रंग देण्यात आला होता. जी एसटीची कायमस्वरुपी ओळख बनली.

भारतीय सैन्याची बस – 1962 साली भारत-चीन आणि 1965 साली भारत-पाक युद्धात 80 बस संरक्षण खात्याला पुरविण्यात आल्या होत्या.

भारतीय सैन्याची बस – 1962 साली भारत-चीन आणि 1965 साली भारत-पाक युद्धात 80 बस संरक्षण खात्याला पुरविण्यात आल्या होत्या.

पहिली वातानुकूलित (AC) बस – 1965 साली एसटी महामंडळाची पाहिली एसी रस्तावर धावली होती.

पहिली डबल डेकर बस – 1967 साली पुण्याच्या दापोडी कार्यशाळेत दुमजली ट्रेलर बस तयार करण्यात आली होती. लेलँड आणि महिंद्र कंपनीचे वेगवेगळे पार्ट वापरुन ही बस तयार करण्यात आली होती.

पुढील दाराची बस – 1970 साली पुढील बाजूला एकच दरवाजा असणारी बस तयार करण्यात आली होती. जिची आसनक्षमता ही 56 होती.फोटो सौजन्य: MSRTC/Twitter

एशियाड – 1982 साली दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची ने-आण करण्यासाठी खास एसटी बस तयार करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर या बसेस एशियाड नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT