गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी ममता बॅनर्जींची भाजपला मदत – अधीर रंजन चौधरींचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दैदीप्यमान कामगिरी आणि काँग्रेसची निराशा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. गोव्यातही काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देईल असा अंदात होता. परंतू प्रत्यक्षात काँग्रेसला गोव्यात १२ जागांवर समाधान मानावं लागलं. तृणमुल काँग्रेसने गोव्यात एंट्री करत दोन जागा जिंकल्या.

ADVERTISEMENT

यानंतर काँग्रेसने तृणमुलवर टीका करताना गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी तृणमुलने भाजपला मदत केल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी हा आरोप केला आहे.

काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही, भाजपविरुद्ध पक्षांनी एकत्र येण्याची गरज- ममता बॅनर्जी

हे वाचलं का?

“सध्याच्या घडीला देशभरात काँग्रेसचे ७०० आमदार आहेत. काँग्रेसने विरोधकांची २० टक्के मत जिंकली आहे. ममता बॅनर्जी या भाजपच्या दलाल बनून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच सध्या त्या खूप काही बोलत आहेत”, पश्चिम बंगालमधील विद्यार्थी अनिश खानच्या संशयास्पद मृत्यूविरोधात आयोजित आंदोलानामध्ये चौधरी बोलत होते.

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांमधील काँग्रेसच्या कामगिरीवर टीका करताना, आता काँग्रेसवर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नसल्याचं वक्तव्य केलं होतं. चौधरी यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्या – संजय राऊत

ADVERTISEMENT

ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणात कोणतंही स्थान नाही. म्हणूनच त्या कधी ईव्हीएम तर कधी काँग्रेसच्या नावाने खडे फोडत असतात. तुम्ही काँग्रेसवर टीका का करत आहाता? स्वतःच्या जीवावर पंतप्रधान होऊन दाखवा असा टोला अधीर रंजन चौधरींनी यावेळी ममता बॅनर्जींना लगावला. तृणमुल काँग्रेसने गोव्याची निवडणुक भाजपला खुश करण्यासाठीच लढवली असंही चौधरी म्हणाले.

साहेबांना हे चांगलंच माहित आहे, त्यात फसू नका! भाजप विजयावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रीया

भाजपसोबत तुमचे संबंध सुधारावेत म्हणूनच तुम्ही काँग्रेसचा पराभव करण्यात त्यांना मदत केली. ममता बॅनर्जींनी गोव्यात काँग्रेसला खिंडार पाडलं हे सर्वांना माहिती आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीत तृणमुलला किती जागा मिळाल्या? असा प्रश्न चौधरींनी ममतांवर टीका करत विचारला.

Goa Result : मीच मुख्यमंत्री होणार ! डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT