Viral Video: आरारारा खतरनाक! 'SCORPIO' चा जबरा फॅन...घराच्या छतावरच केली पार्किंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Scorpio parking on house roof viral video
Scorpio parking on house roof viral video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्कॉर्पियो कारचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

point

घराच्या छतावरील कार पार्किंचा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

point

स्कॉर्पियोचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Scorpio parking on house roof viral video : अनेक लोक कारचे शौकीन असतात. कारच्या बाबतीत प्रत्येकाची वेगवेगळी पसंत असते. स्कॉर्पिओ अनेक लोकांची फेव्हरेट कार असून ही कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्नच असतं. अशाच स्कॉर्पियो कारच्या एका भन्नाट चाहत्यानं त्याची कार चक्क घराच्या छतावरच ठेवली आहे. परंतु, कारचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. यामागचं कारण जाणून तुम्हाही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. 

ADVERTISEMENT

स्कॉर्पियो लव्हरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

विक्की प्रजापत नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, चार मजली घराच्या छतावर एक स्कॉर्पियो कार पार्क केली आहे. घराच्या छतावर पाण्याची टाकी असल्याचं आपण नेहमीच पाहतो. परंतु, या छतावर चक्क कार पार्क केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. छतावर लावलेली कार नसून ही एक यूनिक टाकी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Interview: "...म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही"; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

पाण्याची टाकी

हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला 8.7 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर 4 लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या कलाकृतीचा मेस्त्री कुठे आहे? असा सवाल नेटकऱ्यांनी या स्कॉर्पियो लव्हरला केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, या कलाकाराला 5 लाख नाही, 50 लाख दिले पाहिजेत. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, ही तर पाण्याची टाकी आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Video: "जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा...", भाजपने उद्धव ठाकरेंवर केला पलटवार, फडणवीसांच्या बॅगेत काय सापडलं?

तर अन्य एका यूजरने म्हटलं, कलाकाराने कमालच केली आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार लव्हर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केल्याचं या पोस्टमध्ये पाहू शकता. कार चालवण्याची आवड प्रत्येकाला असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण कारचा जबरा फॅन अशाप्रकारचे छतावर अनोखा प्रयोग करू शकतो, असा विचार कुणाच्याही मनात आला नसेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT