Maratha Reservation : शिंदे सरकारला ज्याची भीती, मनोज जरांगेनी उपसले ‘तेच’ शस्त्र! सांगितली पुढची स्ट्रॅटजी
मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. आता सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे कारण आता समितीनेही आता पुरावे दिले आहेत. नाही तर आताचे आंदोलन सरकारला झेपणार नाही असं इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला जोपर्यंत सरसकट आरक्षण दिलं जात नाही. तोपर्यंत आरक्षणाची (Maratha Reservation) धग कमी होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला (Government of Maharashtra) दिला आहे. 25 तारखेपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे तर 28 पासून बेमुदत उपोषणाला (indefinite agitation) सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सरकारला सांगितले आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण घेतल्याशिवाय राज्यातील एकाही नेत्याने आमच्या गावात येऊ नये असंही त्यांनी राजकीय नेत्यांना (political leaders) बजावले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी साखळी उपोषणाचा इशारा दिला असला तरी त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाची धग काय असते ते या आंदोलनामुळे आता कळेल अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.(manoj jarange patil has again warned shinde-fadnavis-pawar government for maratha reservation)
ADVERTISEMENT
25 तारखेपासून आंदोलन पुन्हा सुरु
मराठा आरक्षणासाठी सरकारकडून वेगवेगळ्या वाटा शोधल्या जात आहेत. मात्र तरीही आता या समितीने दिलेल्या पुराव्यावर आरक्षण दिले नाही तर मात्र आता पुन्हा एकदा आम्ही 25 तारखेपासून आंदोलन पुकारणार आहे. यावेळी मात्र आता हे आंदोलन सरकारला झेपणारं नसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारने जर या आंदोलनाचीही कोणतीही दखल घेतली नाही तर त्यानंतर 28 तारखेला साखळी आंदोलनातून आरक्षणाची मागणी पुन्हा केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी सरकारने विचार करुन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा >>Dalip Tahil Case : एक चूक अन् अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा, 2018 चं प्रकरण काय?
राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन सुरू झाल्यापासून अंतरवाली सराटीमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भेटी घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही त्यांची भेट घेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना राजकीय नेत्यांना तुम्ही येऊ देणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, कायद्याच्या आधारेवर जे जे नेते पदावर बसले आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये आरक्षणाविषयी येऊ नये असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
हे वाचलं का?
प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन पुकारले जाणार असून 28 पासून सुरु होणारे आंदोलन आता सरकारला झेपणारं नाही असं सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आता 28 तारखेपासून जरांगे पाटील आंदोलनातून नेमकं काय सांगणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जरांगे पाटील यांचे हे आंदोलन आता साखळी पद्धतीने सुरु होणार असल्याने महाराष्ट्रातून या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शांततेचं युद्ध होणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होत आहे. तरीही जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केले आहे. त्याच वेळी त्यांनी हे आंदोलन म्हणजे शांततेचं युद्ध होणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> डेटिंग अॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story
कुणीही आत्महत्या करायची नाही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा आरक्षणासाठी यापुढे कोणीही आत्महत्या करणार नाही. आता यावेळी तुमची खरी गरज मला आहे. खांद्याला खांदा लावून लढायचे असेल तर तुम्ही माझ्या सोबत असणं ही काळाची गरज असल्याचे सांगत. आरक्षणासाठी तुम्ही आता आत्महत्या करायची गरज नाही. त्यामुळे कोणीही आता आत्महत्या करु नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT