Sarsenapati Hambirrao Review : भव्यदिव्य अन् खिळवून ठेवणारा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोणतेही युद्ध हे एकटा राजा कधीही लढू शकत नाही…त्याला सोबत असते ते त्याच्या मावळ्यांची…प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी, शूर मावळे सोबत असल्यास कोणतही युद्ध जिंकणे अशक्य नाही…छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असेच निष्ठावान सोबती होते म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली.

महाराजांच्या मराठा स्वराज्यात असाच एक कर्तबगार पराक्रमी सोबती होता…सरसेनापती हंबीरराव मोहिते…हंबीरराव मोहिते हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. इसवि सन 1674 साली त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

या पराक्रमी मावळ्याची यशोगाथा मोठ्या पडद्य़ावर येण्याची नितांत गरज होती. आणि प्रवीण विठठल तरडे या अवलिया लेखक,दिग्दर्शकाने राजांच्या तालमीत तयार झालेल्या हंबीररावांची गाथा लार्जर देन लाईफ अतिशय उतकृष्ठ साकारली याला तोड नाही…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्वराज्य खंबीर मामा हंबीर असं मावळे ज्या पराक्रमी यौध्दयाबद्दल म्हणायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हंबीरराव… मोहिते घराणे म्हणजे भोसले घराणाच्या अगदी जवळचे मानले जाणारे आणि कऱ्हाडजवळील तळबीड येथील शौर्याची परंपरा लाभलेले घराणे होय.

मोहिते घराण्यातील संभाजी मोहीते यांचे सुपुत्र म्हणजे हंसाजी मोहीते. हंसाजी मोहितेंच्या पराक्रमावर खुश होऊन शिवरायांनी त्यांना ‘हंबीरराव’ हा किताब दिला आणि पुढे हेच हंसाजी मोहिते हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले जाऊ लागले. मोहिते घराणे नेहमीच प्रत्येक संकटात भोसले घराण्यासोबत निधड्या छातीने उभे राहत असत.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वात सरसेनापतीपदाचा बहुमान मिळालेले हंबीरराव मोहिते एकमेव सेनापती होते. हंबीरराव मोहिते जितके पराक्रमी तितकेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ट सेनापती होते.

ADVERTISEMENT

हंबीरराव मोहितेंना छत्रपती शिवरायांच्या प्रशासनाची पुर्ण ओळख होती. तसेच गणिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक अशी हंबीररावांची ओळख होती. हंबीरराव मोहिते हे धोरणी आणि स्वराज्यनिष्ठ होते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य पोरका झाला होता. या काळात देखील देखील हंबीरराव मोहिते हे खंबीरपणे संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहिले होते. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे बंधू आणि राजाराम यांचे मामा होते पण स्वराज्यात दुही नको म्हणून त्यांनी नेहमीच संभाजी महाराजांना साथ दिली.

यावरूनच हंबीररावांची शिवाजी महाराजांप्रती आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा दिसते. हंबीरराव आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी झिजत राहिले.

अशा निधड्या छातीच्या पराक्रमी यौद्ध्याची गाथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी तितकीच महत्वाची होती त्या सिनेमाची भव्यता.. प्रवीण तरडे लिखीत दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव या सिनेमाचं वेगळेपण हेच आहे की ती भव्यता सिनेमात कायम ठेवण्यात आली असून, हा एक बिग बजेट सिनेमा आहे हे त्याच्या ट्रीटमेंटवरूनच लक्षात येतं.

परिस्थिती जेवढी बिकट मराठी तितकाच तिखट या संवादांबरोबरच प्रवीणने सिनेमाचं दिग्दर्शनही उत्तम केलं आहे. या सिनेमाची तांत्रिक बाजूही तितकीच महत्वाची आणि दमदार आहे. ज्याचा कँमेरा फक्त टीपत नाही तर बोलतो असा सिनेमँटोग्राफर महेश लिमये याने त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेली हंबीरराव निव्वळ लाजवाब आहे. पी के कुमारांची साहसदृश्य, मदन मानेचं कलादिग्दर्शन ही तितकंच महत्वाचं आहे कारण त्याने सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय..

हंबीररावांच्या भूमिकेत स्वत प्रवीण तरडेंनी कमाल केली आहे. हंबीररावांचा पराक्रम नुसता पडद्यावर दाखवून चालणार नाही तर तो आपल्या नसांनसांत भिनायला हवा हेच दाखवून दिलंय प्रवीण तरडेने…

प्रवीण हंबीरराव हा रोल अक्षरक्ष जगला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दुहेरी भूमिकेत गश्मीर महाजनीने उत्तम काम केलं आहे.उपेंद्र लिमये, मोहन जोशी, श्रृती मराठे, किरण यज्ञोपवीत, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, क्षितीज दाते, देवेंद्र गायकवाड यांनीही उत्तम साथ दिली आहे.

या सिनेमात लक्ष्मीबाई हंबीरराव मोहितेच्या भूमिकेतील स्नेहल तरडेंनी लक्ष वेधून घेतलं आहे. मुळात स्नेहल तरडे एक उत्तम अभिनेत्री आहे. पण बऱ्याच काळानंतर तिने केलेलं पदार्पण तितकंच जबरदस्त आहे, हे धर्मवीरनंतर हंबीररावमध्येही स्पष्ट होतं.

प्रवीण विठ्ठल तरडेचा सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा नक्कीच दमदार, भव्यदिव्य आणि अफलातून आहे, त्यामुळे मी या सिनेमाला देतोय ४ स्टार. तेव्हा ही भव्यता, हंबीररावाचं कर्तृत्व याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच पाहायला हवा सरसेनापती हंबीरराव

    follow whatsapp

    ADVERTISEMENT