आमदार बच्चू कडूंना उस्मानाबाद कोर्टाने ठोठावला पाच हजारांचा दंड, ‘हे’ आहे कारण
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात सुनावणीला हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंट काढले होते त्यात बच्चू कडू हजर झाल्यानंतर कोर्टाने हा दंड सुनावला. तर जामीन रद्द करण्याची तंबी यापुढील सुनावणीला हजर न […]
ADVERTISEMENT
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद
ADVERTISEMENT
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बचू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात सुनावणीला हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने अटक वॉरंट काढले होते त्यात बच्चू कडू हजर झाल्यानंतर कोर्टाने हा दंड सुनावला.
तर जामीन रद्द करण्याची तंबी
हे वाचलं का?
यापुढील सुनावणीला हजर न राहिल्यास थेट जामीन रद्द करण्याची तंबी जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली तसेच हे प्रकरण कडू हजर न झाल्याने गेली चार वर्षे प्रलंबित असल्याने न्यायाधीश गुप्ता यांनी खडेबोल सुनावले. यापुढे तारखेला वेळेवर हजर राहावे व सहकार्य करावे, अति आवश्यक काम असेल तर वकील मार्फत कळवावे असे सांगितले. कडू यांच्यासह अन्य 3 आरोपीना सुद्धा दंड सुनावला, आंदोलन करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
ADVERTISEMENT
2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेत 3%अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते यावेळी कडू स्वतः हजर होते व त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते आंदोलन दरम्यान कडू व अधिकारी यांचा वाद झाला होता त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यात प्रहारचे अध्यक्ष बचू कडू, मयूर काकडे, बलराज रणदिवे, कसबे हे आरोपी होते.
ADVERTISEMENT
आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आवळला नाराजीचा सूर
प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सुर आवळला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका प्रहार पक्ष एकटा लढणार असून जर शिंदे गट व भाजपने त्यांची मर्जी असेल त्यांनी सोबत घेतले तर ठीक नाही तर आम्ही स्वतंत्र लढू असे सांगत बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजी नाराजीचा सूर आवळला आहे
मंत्री मंडळ विस्तारबाबत सांगणे कठीण ते इतके सोपे नाही, अजून 15 -20 जणांना मंत्री करायचे आहे वेगळी नीती आसू शकते
मंत्री मंडळाच्या विस्तारात मी असेल पन मंत्री पद नाही दिले तर बचू कडू आहे चांगल होण्यासाठी वेळ लागतो असे सांगत त्यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली व दिव्यांग मंत्री होण्यास आवडेल असे म्हणाले. बच्चू कडू हे उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टाच्या तारखेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT