सातारा: पाच महिन्याच्या बाळाची आईकडून हत्या, मृतदेह पुरला; 12 दिवसांनी पोलिसांना दिली माहिती
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणंद तरडगाव भागात एका आईने आपल्याच पाच महिन्यांच्या बाळाची हत्या करुन त्याचा मृत्यू श्वास गुदमरुन झाल्याचा बनाव केला. इतकच नव्हे तर या आईने बाळाचा मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर 12 दिवसांनी पोलिसांना फोन करत आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी आई आरती […]
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणंद तरडगाव भागात एका आईने आपल्याच पाच महिन्यांच्या बाळाची हत्या करुन त्याचा मृत्यू श्वास गुदमरुन झाल्याचा बनाव केला. इतकच नव्हे तर या आईने बाळाचा मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर 12 दिवसांनी पोलिसांना फोन करत आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी आई आरती गायकवाडला अटक केली असून न्यायालयाने या महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरडगाव येथे राहणाऱ्या आरती गायकवाड यांनी 12 एप्रिलला आपल्या बाळाची हत्या केली. पाच महिन्यांचा आपला मुलगा कार्तिक गायकवाडला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक-तोंड दाबून आईने हत्या केली. परंतू मृतदेह जमिनीत पुरल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच रविवारी आरतीने पोलिसांना फोन करत मी माझ्या मुलाला ठार मारुन पुरलं आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा नाहीतर मी दुसऱ्या कोणाचा तरी खून करेन असं सांगितलं.
दुर्दैवी ! खेळण्याच्या नादात उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्यामुळे 4 वर्षीय मुलीचा मृत्यू