लहान मुलांच्या पाण्याच्या बाटलीत लपवण्यात आलं होतं पाच कोटींचं ड्रग्ज, मुंबईत महिलेसह दोघांना अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक महत्त्वाची कारवाई केली आहे या शाखेने पाच कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने युनिट ३ च्या मानखुर्द भागात दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ९३५ ग्रॅम हेरॉईन जप्त केलं आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५ […]
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक महत्त्वाची कारवाई केली आहे या शाखेने पाच कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने युनिट ३ च्या मानखुर्द भागात दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ९३५ ग्रॅम हेरॉईन जप्त केलं आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ८० लाख रूपये आहे असं सांगितलं जातं आहे.
ADVERTISEMENT
ड्रग्जच्या या तस्करांनी लहान मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करत होते. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने ही कारवाई केली आहे. दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. या ड्रग्जची किंमत ५ कोटी ८० लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.
गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात NDPS कायद्याच्या अंतर्गत तपास सुरू केला आहे. ड्रग्ज पेडलर एका चाळीतून ही तस्करी करत होते. लहान मुलांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र क्राईम ब्रांचने या सगळ्यांना अटक केली आहे.
हे वाचलं का?
या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही महिला दीर्घ काळापासून ड्रग्जच्या धंद्यात होती. तिला सहा महिन्यांपासून पोलीस शोधत होते. जेव्हा या महिलेला अटक केली तेव्हा शाळेची बॅग आणि पाण्याची बाटली मिळाली. त्याचाच आधार घेऊन ती पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडे असलेल्या बाटलीत १ किलो ९३५ ग्रॅम हेरॉईन आढळलं जे पोलिसांनी जप्त केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT