India's Got Latent च्या सेटवर पोहोचले मुंबई पोलीस, रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यामुळे अडचणी वाढल्या
रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध युट्यूबर, पॉडकास्टर आणि व्यावसायिक आहे. त्याने या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यानंतर आता रणवीर अलाहाबादिया आणि इतर सगळेच अडचणीत आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'इंडियाज् गॉट लॅटेंट'च्या सेटवर पोहोचले पोलीस
रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानं अडचणी वाढल्या
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडिया गॉट लेटेंट' शोमध्ये अश्लील जोक केल्याबमुळे लोकप्रिय यूट्यूब चॅनल 'बीअरबायसेप्स'वरुन प्रसिद्ध झालेल्या रणवीर अलाबादियाविरुद्ध सोमवारी तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिस अधिकारी मुंबईतील खार येथील शोच्या सेटवर पोहोचले.
हे ही वाचा >> Tanaji Sawant Son : सावंतांचा लेक कुठून उडाला कुठे लँड झाला? नाट्यमय घटनेचा घटनाक्रम 10 मुद्द्यांमध्ये
इंडियाज् गॉट लॅटेंटमध्ये झालेल्या वादानंतर रणवीर अलाबादियाने त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. मी कुठलंही स्पष्टीकरण देणार नाही, मी जे केलं ते चुकीचं आहे, त्यामुळे मी फक्त माफी मागतो असं रणवीर म्हणाला आहे. राहुल ईश्वर, वकील आशिष राय आणि स्थानिक भाजप नेते निलोत्पल मृणाल यांनी दाखल केलेल्या तक्रारींनंतर चौकशी सुरू केल्याचं मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. डीसीपी दीक्षित गेडाम यांनी याप्रकरणी बोलताना माहिती दिली आहे.
हे ही वाचा >>Mahayuti : मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या, शिंदेंचे मंत्री महायुतीत नाराज?
शोमधील एका स्पर्धकाशी बोलताना रणवीर अलाहबादियाने हे वक्तव्य केलं होतं. या प्रश्नावर लगेचच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांनी ऑनलाइन कंटेंटवर कडक नियमांची मागणी केली. मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत अलाहबादिया, समय रैना, शोचे आयोजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा यांच्या नावाचा उल्लेख आहे.









