आदित्य ठाकरेंच्या १० वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार? भाजप-शिंदे-मनसेची खलबत

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(Aditya Thackeray – mumbai-university-senate-election)

ADVERTISEMENT

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत कोअर कमिटीचे सदस्य किरण साळी, पूर्वेश सरनाईक, समाधान सरवणकर, राज कुळकर्णी, अविष्कार भुसे आदी जण उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या आगामी सिनेट निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठीची रणनीती या बैठकीत ठरली असल्याची माहिती आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये ही निवडणूक प्रस्तावित आहे. जवळपास मागील १० वर्षांपासून विद्यापाठीच्या पदवीधर सिनेटमध्ये आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचं वर्चस्व आहे. गत पदवीधर सिनेट निवडणुकीमध्येही युवासेनेने १० च्या १० जागांवर विजय मिळविला होता. आदित्य ठाकरेंचं नेमकं हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठीची तयारी बाळासाहेबांची शिवसेना-भाजप-मनसे या पक्षांनी सुरु केली असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

मनसे नेते नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतली. त्यानंतर आज श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात या निवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्याच्या परिस्थीतमध्ये शिवसेनेप्रमाणेच युवासेनाही दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. यातच सिनेटमधील दोन माजी सदस्य एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी आणि संघटनांनी आपली तयारी सुरू केली असल्याचं चित्र आहे. सोबतचं मतदार नोंदणीवर अधिकाधिक व्हावी यासाठीही भर दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या सिनेट निवडणुकांत नेमकं कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT