मुंबई हादरली! निर्भया घटनेची पुनरावृत्ती; महिलेवर बलात्कार करून क्रूर कृत्य

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरली आहे. मुंबईत एका महिलेवर पाशवी बलात्कार करून त्यानंतर तिच्यासोबत माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीतल्या निर्भया या घटनेची आठवण मुंबईकरांना झाली आहे. बलात्कार केल्यानंतर या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालण्यात आला. या प्रकरणी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतल्या साकिनाका भागात असलेल्या खैरानी रोड परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. DCP आणि ACP हे त्या ठिकाणी पोहचले आणि पुढील चौकशी तातडीने सुरू केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.30 च्या सुमारास मेन कंट्रोल रूमवर एक कॉल आला त्या कॉलवर बोलणाऱ्या माणसाने हे सांगितलं की एक महिला बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. यानंतर पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहचले. पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं आहे.

ज्या महिलेवर बलात्कार झाला तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कलम 376 आणि 307 अन्वये त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती या प्रकरणात घडली आहे. निर्भया प्रकरणात धावत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार झाला. त्यानंतर निर्भयाला फेकून देण्यात आलं त्याआधी तिच्यासोबत अत्यंत क्रूर कृत्य करण्यात आलं. या सामूहिक बलात्कारामुळे दिल्ली हादरली होती. आता मुंबईत या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT