Ncp Crises: शरद पवारांचे समर्थक ‘कलानी कुटुंब’ दादांच्या भेटीला; राजकारणात खळबळ
Ulhasnagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कलानी कुटुंबाबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
Ulhasnagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या आणि उल्हासनगर शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कलानी कुटुंबाबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी, त्यांचा मुलगा ओमी कलानी आणि त्यांची माजी महापौर पत्नी पंचम कलानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. आता या भेटीनंतर कलानी कुटुंब अजित पवार गटात सामील होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Ncp Crises Is Pappu Kalani’s son Omi Kalani Going to join Ajit Pawar group, a new discussion in Maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आणि त्यांचे समर्थक दोन गटात विभागलेले दिसत आहेत. उल्हासनगरमध्ये शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारा कलानी कुटुंबीय कोणत्या गटाला पाठिंबा देतील? याबद्दल कधीही कलानी कुटुंबीयांनी स्पष्ट केले नाही. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ओमी कलानी यांची भेट घेतली होती. त्यामुळे कलानी हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे बोलले जात होते. पण अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Kalyan Crime : किरकोळ वाद अन् मित्रानेच चार्जरच्या वायरने गळा आवळून केला खेळ खल्लास!
कलानी कुटुंबीयांना त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी दोन्ही गटांचे नेते नेहमीच येताना दिसतात, मात्र पहिल्यांदाच पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी आणि त्यांची पत्नी राष्ट्रवादीच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्ष असलेल्या पंचम कलानी थेट यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी (9 ऑक्टोबर) रात्री उशिरा भेट घेतली.
हे वाचलं का?
या भेटीचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्यानंतर ओमी कलानी यांनी अजित पवार यांच्यासोबतची अनौपचारिक भेट असल्याचे सांगितले, मात्र या भेटीनंतर कलानी कुटुंबीय आता अजित पवारांच्या गटात सामील होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
देशातील 5 राज्यात सत्तेचा कौल कोणाला? ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो?
यासंबंधित ओमी कलानी मुंबई तकशी बोलताना म्हणाले की, ‘त्यांची बैठक केवळ अनौपचारिक बैठक होती आणि त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांना भेटलो नव्हतो, त्यामुळे मी मुंबईत असताना अजित पवार यांची भेट घेतली.’
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे नुकतेच गणेशोत्सवादरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कलानी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. इतकेच नाही तर याआधी जितेंद्र आव्हाडही भेटून गेले होते. अजित पवारांचे नेते आनंद परांजपे हेही कलानी कुटुंबीयांच्या भेटीगाठी घेत असतात.
सेल्फीनं घेतला जीव! महाबळेश्वरमध्ये दरीत कोसळून पुण्याची महिला ठार
गुंडातून राजकारणी झालेले पप्पू कलानी उल्हासनगरमधून चार वेळा आमदार राहिले आहेत, त्यापैकी त्यांनी तुरुंगात असताना दोन वेळा आमदारकीची निवडणूक लढवून ते जिंकले होते. त्यांची पत्नी, दिवंगत ज्योती कलानी, या देखील आमदार होत्या. पती पप्पू कलानी तुरुंगात असताना 2019 मध्ये भाजपच्या कुमार ऐलानी यांच्या विरोधात त्या निवडणूक हारली. तसंच, आजही पप्पू कलानी यांचे उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT