Jitendra Awhad : मुघलांचा इतिहास दाखवणार नाही, म्हणजे ते आलेच नव्हते म्हणणार का?

मुंबई तक

NCP Leader Jitendra Awhad : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत. पुण्यातील “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या यात्रेदरम्यान विनोद तावडे यांच्या जुन्या विधानाचा हवाला देत केलेल्या काही वक्तव्यांवरुन वाद रंगला आहे. विनोद तावडेंनी शिक्षणमंत्री असताना “अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार” असं सांगितलं होतं. यावरुन आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

NCP Leader Jitendra Awhad :

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत. पुण्यातील “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या यात्रेदरम्यान विनोद तावडे यांच्या जुन्या विधानाचा हवाला देत केलेल्या काही वक्तव्यांवरुन वाद रंगला आहे. विनोद तावडेंनी शिक्षणमंत्री असताना “अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार” असं सांगितलं होतं. यावरुन आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते”, असं सांगत, तावडेंना उत्तर दिलं. याचवरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. (NCP Leader jitendra Awhad clear his stand on Chhatrapati shivaji maharaj statment)

दरम्यान, या सगळ्या वक्तव्यांवर आणि वादावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘मुंबई तक’ दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अचानक हा विषय का काढला? या प्रश्नांवर बोलताना आव्हाड म्हणाले, कुतुबशाही, निजामशाही आदिलशाही आणि मुघलशाही यांचा काहीही संबंध नाही. विनोद तावडेंना पहिल्यांदा समजावून सांगावं लागेल, मुघलशाही आणि कुतुबशाही यांचं कधीच जमलं नाही. अफलखान हा आदिलशाहीमधून आला होता. हे दक्षिण प्रांतातील सुलतान होते आणि मुघल उत्तरेतील सुलतान होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp