बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– रोहिदास हतागळे, बीड प्रतिनिधी

ADVERTISEMENT

बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यस्थेच्या परिस्थितीवरुन काही दिवसांपूर्वीच विधानसभेत आवाज उठवला होता. ज्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस अधिक्षकांना तातडीच्या रजेवर पाठवल. आमदार प्रकाश साळुंखे, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांनी विधानसभेत बीडच्या पोलीस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

परंतू विधानसभेत कायदा-सुव्यवस्थेबद्दल आवाज उठवणारे संदीप क्षीरसगार हेच बीडमधल्या अवैध धंद्यांचे मास्टरमाईंड असून त्यांचं या धंद्यांना संरक्षण असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.

हे वाचलं का?

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी याविषयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीलं आहे. शिवसेनेने केलेल्या या पत्रप्रपंचामुळे बीड जिल्ह्याच्या राजकराणात सध्या खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी मांडणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचाच अवैध धंद्यांमध्ये छुपा सहभाग आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव राहावा म्हणून त्यांनी ही लक्षवेधी मांडण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

सचिन मुळूक यांनी आपल्या निवेदनात म्हणलं आहे की, “आता आयपीएलची क्रिकेट स्पर्धा सुरु होणार आहे. या अनुषंगाने क्रिकेट सट्टा विरोधात बीड पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम थांबवण्यासाठी बीड पोलिसांवर दबाव आणला जात आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विनंतीला दाद देण्यात न आल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तक्रारी सुरू केल्या. सट्टा लावणारे व घेणारे लोक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याच सानिध्यातील आहेत. तसेच, त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात खाजगी सावकारकी विरोधात भाष्य केले. परंतु मतदारसंघात खाजगी सावकारकी करून पैसे वसूल करणारे खाजगी सावकार आमदार संदीप क्षीरसागर यांचे मित्र व खंदेसमर्थक आहेत. या सावकारांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर क्षीरसागर हेच कारवाई होऊ देत नाहीत.”

पोलिसांनी त्यांच्या दबावात रहावे यासाठी त्यांनी लक्षवेधी उपस्थित करून पोलिसांवर आरोप केले. तसेच, अवैध वाळू उपसा संदर्भात क्षीरसागर यांनी केलेले वक्तव्य हे हास्यास्पद आहे. त्यांचे समर्थक असलेले माजी आमदार सय्यद सलीम यांच्या भावाच्या नावे दोन वाळूचे ठेके आहेत. ते मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलेला आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरोधात कारवाई झाली की कारवाई न करण्यासाठी व वाहन सोडण्यासाठी क्षीरसागर हे पोलीस व महसूल प्रशासनाला फोन करतात. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीचे लोक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत उघडपणे फिरताना दिसून येतात, हे सर्वसामान्यांना माहिती झालं आहे. सर्व प्रकारच्या अवैध धंद्यात क्षीरसागर यांचे समर्थक आणि ते स्वतः सहभागी आहेत आहेत, असा गंभीर आरोप मुळूक यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT