NCP: निवडणूक आयोगात असं काय घडलं की जितेंद्र आव्हाड रडले?, रोहित पवारही आक्रमक

ADVERTISEMENT

ncp sharad pawar vs ajit pawar what happened in election commission that jitendra awhad cried rohit pawar is also aggressive
ncp sharad pawar vs ajit pawar what happened in election commission that jitendra awhad cried rohit pawar is also aggressive
social share
google news

Jitendra Awhad Cried: मुंबई: राष्ट्रवादी कोणाची? यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाली. यासाठी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) निवडणूक आयोगात (Election Commission) हजर होते. त्यांच्यासमोरच ही सुनावणी पार पडली. या सुनावणीत असं काय घडलं की जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) डोळ्यात अश्रू आले? रोहित पवार आणि अजित पवार गटावर का तुटून पडले? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (ncp sharad pawar vs ajit pawar what happened in election commission that jitendra awhad cried rohit pawar is also aggressive)

निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अजित पवारांच्या गटाच्या वकिलांनी एक युक्तिवाद केला त्याचाच उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं ‘हा युक्तिवाद ऐकून डोळ्यात अश्रू आलेट, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.’

हे ही वाचा >> NCP Crisis : अजित पवारांनी थोपटले दंड, शरद पवार ECI च्या कोर्टात, काय झालं?

जितेंद्र आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना स्वत: निवडणूक आयोगामध्ये जाताना बघितलं. दुपारी 4 वाजता सुनावणी सुरु झाली. संध्याकाळी 6 वाजता संपली. ते स्वत: तिथे बसून होते. त्यावेळेस त्यांच्या कानावरही शब्द आले, आमच्या कानावरही शब्द आले. समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. की, ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे. ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अशी निवेदनं वकिलामार्फत करायला लावणं हे दुर्देवं आहे.’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे रोहित पवारांनीही स्वार्थी नेते म्हणत अजित पवार गटावर हल्ला चढवला. रोहित पवार म्हणाले, ‘ज्या माणसाने पक्षाला आणि पर्यायाने नेत्यांना उभं केलं, ताकद दिली, आज त्याच स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात उभं केलं. या स्वार्थी प्रवृत्तींनी आपला स्वाभिमान गहाण टाकला असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या ताकदीने आदरणीय पवार साहेबांसोबत आहेत आणि हीच साहेबांची खरी ताकद आहे.’ असं म्हणत विजय साहेबांचाच होणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनात फूट?, जरांगे-पाटलांविरोधात कोणी घेतली भूमिका?

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगात झालेली सुनावणी आणि त्यात जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी केलेलं हे ट्वीट यामुळे आता अजित पवार गटाचे नेते नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT