भारतात 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय?
भारतात आत्तापर्यंत 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. कोरोनाची सरकारी आकडेवारी जे सांगतेय, त्यापेक्षा प्रत्यक्षातली आकडेवारी मोठी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी सिरोसर्व्हेची मदत घेतली आहे, शिवाय अभ्यासकांच्या निरीक्षणांचाही आधार घेतलाय. पण त्यांच्या त्या मॉडेलचा वापर केला तर महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारीही हादरवून सोडणारी समोर येईल. सगळ्यात पहिले जाणून […]
ADVERTISEMENT

भारतात आत्तापर्यंत 40 कोटी जणांना कोरोना होऊन गेलाय असा दावा न्यूयॉर्क टाईम्सने केलाय. कोरोनाची सरकारी आकडेवारी जे सांगतेय, त्यापेक्षा प्रत्यक्षातली आकडेवारी मोठी असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी सिरोसर्व्हेची मदत घेतली आहे, शिवाय अभ्यासकांच्या निरीक्षणांचाही आधार घेतलाय. पण त्यांच्या त्या मॉडेलचा वापर केला तर महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारीही हादरवून सोडणारी समोर येईल.
सगळ्यात पहिले जाणून घेऊया की, भारतातली सरकारी आकडेवारी किती आहे आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या दाव्यानुसार प्रत्यक्षातली आकडेवारी किती असू शकते.
महामारीतल्या रुग्णांची प्रत्यक्षातली आकडेवारी समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा 15 पटीने अधिक असते, मृत्यू दरही 0.15 टक्के असतो असं अभ्यासक सांगतात.
त्यामुळे या न्यायाने भारताचा विचार करायचा झालं तर भारतात 24 मेपर्यंत 40 कोटी 42 लाख जणांना कोरोना झालाय.
हीच आकडेवारी 20 पटीने अधिक आहे असं धरून चाललं तर भारताची प्रत्यक्षातली आकडेवारी असेल 53 कोटी 90 लाख.
आता याच पॅटर्ननुसार महाराष्ट्रातली अंदाजे आकडेवारी काढायची ठरवलं तर सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 52 लाख 18 हजार 768 जणांना कोरोना झालाय. प्रत्यक्षात ही आकडेवारी 15 पटीने अधिक होती असं म्हटलं तर न्यूयॉर्क टाईम्सच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आत्तापर्यंत प्रत्यक्षात 7 कोटी 82 लाख 81 हजार 520 इतक्या जणांना कोरोना होऊन गेलाय.
शिवाय सरकारी आकडेवरी 20 पटीने अधिक होती असं म्हटलं तर, महाराष्ट्रातली प्रत्यक्षातली आकडेवारी 10 कोटी 43 लाख 75 हजार 360 इतकी असेल.
म्हणजे महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून अधिक नागरिकांना कोरोना होऊनही गेला असेल असं यातून स्पष्ट होतंय. पण याला वैज्ञानिक आधार आहे असं आपण म्हणू शकत नाही.
शिवाय जानेवारी महिन्यातल्या सिरोसर्व्हेनुसारही कोरोनाची समोर आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातली आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचं दिसून येतंय.
त्यासाठी सिरोसर्व्हेतून समोर आलेली आकडेवारी जाणून घेऊया..
11 मे ते 4 जून या कालावधीत झालेल्या पहिल्या सेरोसर्व्हेच्यावेळी 226,713 इतके रुग्ण सरकारी आकडेवारीनुसार होते. तर सेरोसर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार 6,460,000 इतक्या जणांना प्रत्यक्षात कोरोना होऊन गेलेला.
18 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या दुसऱ्या सेरोसर्व्हेच्यावेळी 5,490,000 इतके रुग्ण सरकारी आकडेवारीनुसार होते. तर सेरोसर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार 74,300,000 इतक्या जणांना प्रत्यक्षात कोरोना होऊन गेलेला.
18 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत झालेल्या तिसऱ्या सेरोसर्व्हेच्यावेळी 10,400,000 इतके रुग्ण सरकारी आकडेवारीनुसार होते. तर सेरोसर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार 271,000,000 इतक्या जणांना प्रत्यक्षात कोरोना होऊन गेलेला.
आता हा दावा कशाच्या आधारावर करण्यात आलाय? त्यासाठी प्रमुख 7 मुद्दे जाणून घेऊया..
1) जिथे कोरोना रुग्णसंख्येच्या मोजमापासाठी खात्रीशीर प्रक्रियेचा वापर केला जातो अशा देशांमध्येही सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्षातल्या आकडेवारीत तफावत असते. त्यामुळे भारतात तर ही तफावत असूनच शकते, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
2) अभ्यासकांच्याच म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पण कोरोनाची चाचणीच न केलेल्यांचं प्रमाण भारतात अधिक आहे.
3) जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार कोरोना मृतांची जगातल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातली आकडेवारी 2 किंवा 3 पटीने अधिक असू शकते
4) भारतात लाखोंच्या घरात रुग्णसंख्या आढळत असल्याने हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे टेस्टही न करता घरच्या घरी उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.
5) भारतातल्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णाचा घरी मृत्यू झाल्याने सरकारी आकडेवारीत त्याचा सहभाग करूनच घेतला गेला नाही, याचं प्रमाणही अधिक आहे, त्यामुळे भारतातल्या आकडेवारीत फरक असू शकतो असं, एमोरी युनिव्हर्सिटीमधल्या व्हायरोलॉजिस्ट कायको शिओडा यांनी म्हटलं आहे.
6) शिवाय भारतात मृत्यूचं निदान करण्याच्या प्रक्रियेतही त्रुटी आहेत. कोरोनाने झालेले 5 पैकी 4 मृत्यू वैद्यकीय तपास करून घोषित करण्यात आलेलेच नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे.
7) भारतातल्या कोरोनास्थितीचा नेमका अंदाज घेण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सने सिरोसर्व्हेची मदत घेतली. नागरिकांच्या रक्ताच्या चाचणीत आढळलेल्या अँटीबॉडीजवरून यात अनुमान लावलं जातं. मात्र या सिरोसर्व्हेला देखील काही मर्यादा असल्याने, त्यातूनही निश्चित आकडेवारी समोर येणारच नाही असं, डॅन वाईनबर्गर, येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील एपिडेमिओलॉजिस्ट म्हणतात.
शिवाय भारतातल्या मृत्यू दराबद्दल यात सांगितलं की, भारतातली वयानुसार मृत्यूची आकडेवारी काढताना लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत झालेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण श्रीमंत देशांपेक्षा इतर देशांत अधिक समोर. शिवाय कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये श्रीमंत देशांपेक्षा मृत्यू दर कमी होता, असंही समोर आलं. या सर्वातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे भारतातला कोरोना जितका ऑफिशियल आकडेवारीत दाखवला गेला त्यापेक्षा निश्चितच जास्त प्रभावशाली होता.