गडकरी अन् आमचं दुखणं एकच, त्यांनी काँग्रेससोबत यावं : नाना पटोलेंचं जाहीर आमंत्रण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

रत्नागिरी: केंद्र सरकारच्या विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आणि आमचं दुखणं सारखंच आहे, तुम्ही आमच्यासोबत या अशी विनंती आपण गडकरी यांना केली असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील भारी मंत्री मोदी सरकारबद्दल बोलत आहेत. चिपळूणमध्ये काँग्रेस मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते हुसेन दलवाई, माजी आमदार हुसनाबानो खलिफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदि उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांना काढला चिमटा

नाना पटोले यावेळी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही, ते पद मंत्री असतं. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे मागच्या 2014 च्या सरकारमध्ये पोलीस कमिशनर होते म्हणजे प्रमुख होते. आता त्यांना डीसीपी बनवून टाकलं आहे, फार अपमान केला आमच्या मित्राचा भाजपने असं म्हणत नानांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.

हे वाचलं का?

नितीन गडकरींच्या त्या वक्तव्यावरुन नानांनी साधला निशाणा

नितीन गडकरी ऍग्रो व्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. ”मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे सरकारच्या फार भरोशावर राहू नका. मी सरकार आहे म्हणून सांगतो आपल्याकडे दोन गोष्टी होतात एक तर आपला विश्वास सरकारवर आहे किंवा मग परमेश्वरावर आहे.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. नितीन गडकरी नेहमीच आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा ते आपल्या सरकारच्या विरोधात मोकळेपणाने बोलत असतात.

नाना पटोलेंनी घेतली रिफायनरी विरोधकांची भेट

कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी पोहोचत असेल, तर काँग्रेस त्याचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचाही रिफायनरीला विरोध आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाना पटोले काल रिफायनरी विरोधकांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी रिफायनरी विरोधी महिलांकडून जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी नाना पटोले यांनी घेतली रिफायनरी समर्थकांची भेट घेतली होती. यावेळी रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या विधान परिषदेचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT