सचिन वाझेंना अटक, फडणवीस म्हणतात…आता तर सुरुवात झाली आहे!
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्फिओ गाडी प्रकरणी NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने भाजप मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं म्हटलं. याला […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्फिओ गाडी प्रकरणी NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने भाजप मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी, वाझेंशी माझी दुष्मनी नाही. ते काळे की गोरे हे देखील मी पाहिलं नाही. पण मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी जर अशाप्रकारे काम करत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेवर कसा विश्वास राहिलं? असं उत्तर दिलं.
सचिन वाझेंचं सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल- कंगना राणौत
यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी आता तर नुसती सुरुवात झाली आहे. या प्रकरणाचा एक भाग समोर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं सांगितलं. दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत वाझे यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं. ते ओसामा बिन लादेन आहेत का वगैरे प्रश्न विचारुन त्यांची वकिली करण्याचं काम सरकारने केलं. पण NIA ने तपास हाती घेतल्यानंतर आता त्यांना यामध्ये महत्वाचे पुरावे मिळत आहेत. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणीही काही महत्वाचे धागेदोरे आणि पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सचिन वाझेंपुरतं मर्यादीत नाही. त्यांना कोणी पाठींबा दिला, यामागे कोण आहे हे देखील आगामी काळात पुढे येईल.
सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणतात…