उल्हासनगर : कुख्यात गुंड जग्गु सरदारवर तडीपारीची कारवाई
उल्हासनगर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार गुंडांवर पोलिसांनी एमपीएडी कायद्याअंतर्गत कारवाई केलीय. यात कुख्यात गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश तिरथसिंग लबाना, प्रेमचंद पंजाबी उर्फ ढकणी, स्वप्नील कानडे आणि अनिल उर्फ बाळू धिवरे यांचा समावेश आहे. आतापर्यंत परिमंडळ ४ मधील ४७ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त अजून ४० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होणार असल्याचं कळतंय. […]
ADVERTISEMENT
उल्हासनगर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या चार गुंडांवर पोलिसांनी एमपीएडी कायद्याअंतर्गत कारवाई केलीय. यात कुख्यात गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश तिरथसिंग लबाना, प्रेमचंद पंजाबी उर्फ ढकणी, स्वप्नील कानडे आणि अनिल उर्फ बाळू धिवरे यांचा समावेश आहे. आतापर्यंत परिमंडळ ४ मधील ४७ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त अजून ४० गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होणार असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
जग्गु सरदार ऊर्फ जगदीश तिरथसिंग लबाना याच्याविरुध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरीता एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी जग्गु सरदार ऊर्फ जगदिश तिरथसिंग लबाना याची तळोजा कारागृहात रवानगी केली आहे.
पिंपरी-चिंचवड : हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा पथकाने ४ महिलांची केली सुटका
हे वाचलं का?
याव्यतिरीक्त उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दुखापती असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ३८ जणांवरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त टोळीयुद्धातून दहशत माजवणाऱ्या इतर १० जणांवरही पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय.
डोंबिवली: बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे पडायचे कमी, लाड पुरविण्यासाठी तरुण चोरायचा बाइक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT