शिवसेनेला फक्त मुख्यमंत्रिपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली, आता तरी…: चंद्रकांत पाटील
स्वाती चिखलीकर, सांगली: ‘शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगुबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून आता शिवसेना संपत चालली आहे.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील महापालिका प्रभाग 16 अ येथील पोटनिवडणूकच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलत होते. मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि […]
ADVERTISEMENT
स्वाती चिखलीकर, सांगली: ‘शिवसेना ही मुख्यमंत्रीपदाच्या एका गुबगुबीत खुर्चीपुरती मर्यादित झाली असून आता शिवसेना संपत चालली आहे.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील महापालिका प्रभाग 16 अ येथील पोटनिवडणूकच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
ADVERTISEMENT
मंत्री जयंत पाटील यांना घेरावा घातला ही सांगलीतील स्थानिक शिवसैनिकांची भूमिका योग्यच असून जनता आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादीला वैतागले आहेत. असा टोलाही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
‘मुंबै बँकेत अध्यक्ष राष्ट्रवादी आणि उपाध्यक्ष भाजपाचा निवडून आला आहे. त्यामुळे आता तरी शिवसेनेला कळायला हवं की, शिवसेनेला फक्त एक मुख्यमंत्रीपदाची गुबगुबीत खुर्ची मिळाली आहे. बाकी काही मिळालं नाही. शिवसेनेला सहकार, विद्यापीठ कायदा अश्या अनेक गोष्टीची माहिती नाही.’ असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
‘मंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसचा प्रचार केला काय किंवा शिवसेनेचा तरी सांगलीत भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. मात्र, सांगलीतील शिवसैनिकांनी मांडलेली भूमिका योग्य असून सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा वैतागलेला आहे. अन् त्याचे चित्र म्हणजे जयंत पाटील यांना शिवसैनिकांनी सांगलीत घातलेला घेराव आहे.’ अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘भाजप मुस्लिम विरोधी असल्याचा चुकीचा आरोप’
ADVERTISEMENT
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. ‘लोकांमध्ये नेहमीच चुकीचे सांगितले जाते कि, भाजप पक्ष हा मुस्लिमांविरोधात आहे. असे काही नाही. सांगली महापालिकेत 43 नगरसेवकांपैकी 3 मुस्लिम महिला या भाजपच्या नगरसेविका आहेत. आम्ही जर मुस्लिम विरोधी असतो तर आम्ही मुस्लिम महिलांना तिकीट दिलंच नसतं. कोरोनामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशनचे धान्य दिले.’
ADVERTISEMENT
‘मोदींनी असे म्हंटले नाही कि, हे धान्य मुस्लिमांना द्यायचे नाही. प्रत्येक गोष्टीत मुस्लिम समाजाची भागीदारी आहे. भाजप हे मुस्लिम विरोधी आहे हे सांगितलं जात ते साफ चुकीचे आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या काळात आम्ही मदरसामध्ये कॉम्पुटर दिली. तिथे शिकविणाऱ्या शिक्षकांना मानधन चालू केले. हे भाजपवर होणारे आरोप राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन केले जात आहेत.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
ठाकरे सरकारच्या हातालाच नाही तर बुद्धीलाही लकवा मारला आहे-चंद्रकांत पाटील
दरम्यान, महापुराच्या काळात भाजपने जेवढी मदत दिली तेवढी मदत या आघाडी सरकारने दिली नाही. आम्ही पाण्यात उभं राहून मदतीचे जीआर काढले आहेत. असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यावेळी लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT