महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्लान ठरला?

मुंबई तक

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. पोहरादेवी गडावरील महंतांना बंजारा समाज मानतो. याच महंतांना आपल्या बाजूनं वळवण्यात ठाकरेंना यश आलंय. महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी संजय राठोडांचा शह करण्याचे संकेतही दिलेत. पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी (३० सप्टेंबर) मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केलीये. पोहरादेवी गडावरील महंतांना बंजारा समाज मानतो. याच महंतांना आपल्या बाजूनं वळवण्यात ठाकरेंना यश आलंय. महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी संजय राठोडांचा शह करण्याचे संकेतही दिलेत.

पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांनी शुक्रवारी (३० सप्टेंबर) मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक उपस्थित होते.

महंत सुनील महाराजांना संजय राठोडांविरुद्ध देणार उमेदवारी?

महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, संजय राठोडांविरुद्ध निवडणूक लढवणार का? याला उत्तर देताना महंत सुनील महाराज म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हा निर्णय घेतील.’

हे वाचलं का?