केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात, शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट करणं भोवलं
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे शेअर केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं.
केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केतकीने पोस्ट केलेली पोस्ट
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll