‘आता शिवसेनेनं ठरवायंच की…’, शिंदेंच्या भेटीनंतर आंबेडकरांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

prakash ambedkar press conference today : वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) प्रकाश आंबेडकर (prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची बुधवारी रात्री भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या (political speculation) चर्चा सुरू झाल्या. आंबेडकर-शिंदे (ambedkar-shinde) एकत्र येण्याच्या चर्चेनंही डोकं वर काढलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद (prakash ambedkar press conference) घेत भेटीचं कारण सांगितलं आणि राजकीय भूमिकाही स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) मी साडेदहाला भेटायला गेलो. मध्यंतरी नोएडाला बाबासाहेबांच्या पुतळ्याच प्रतिकृती तयार केलीये. त्याची पाहणी करण्यासाठी एक टीम सरकारने पाठवली होती. त्या टीममधल्याची वेगवेगळी मतं आली. त्यामुळे जेव्हा दिल्लीला जाईल, तेव्हा नोएडातील पुतळ्याची पाहणी करणार आहे.’

शिंदेंच्या भेटीबद्दलही प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले, ‘दुसरं जे आहे ते मागच्या सरकारने स्वीकारलं नाही. महाराष्ट्र विकास आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात. तिथं एक आंतरराष्ट्रीय केंद्र असलं पाहिजे, समन्वयासाठी. त्यासाठी सात जणांची नावं मी सूचवली होती. त्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीत प्रारुप तयार करण्यात आलं होतं. मला जसं हवं, तसं आहे की नाही, त्यावरही चर्चा आमची चर्चा झाली.’

हे वाचलं का?

ठाकरेंना सोबत हवा असलेला वंचित ‘फॅक्टर’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी खरंच महत्त्वाचा?

वंचित बहुजन आघाडी : उद्धव ठाकरेंकडे बोट, आंबेडकरांचा एकनाथ शिंदेंनाही सशर्त प्रस्ताव

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘बऱ्याच गोष्टी चर्चिल्या गेल्या, पण पक्षाची आमची जी भूमिका आहे, ती शिवसेनेबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायच्या. तो निर्णय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. त्यांना याचीही जाणीव आहे की, ज्या-ज्या पक्षाबरोबर भाजप आहे, त्या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी असो भारिप हा कधीही गेला नाही.’

ADVERTISEMENT

‘विरोधातला विरोध हा आपला मित्र अशी भूमिका राजकारणात असते, पण भाजप-आरएसएस यांच्याबरोबरचं भांडण हे व्यवस्थेचं भांडण आहे. ज्याला आम्ही उद्ध्वस्त केलं. हलवलं. तिचं व्यवस्था भाजप-आरएसएस आणू इच्छित आहे. तत्वांमध्ये हे बसत नाही, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की, भाजप बरोबर कोणताही समझौता नाही. त्याचबरोबर भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्या बरोबरही समझौता नाही. भाजपबद्दलची माझी भूमिका महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीये, त्यामुळे जे तर्कविर्तक लावले जात आहे’, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकरांसाठी डाव टाकला, पण उद्धव ठाकरेंचे पत्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात

तोपर्यंत हे तर्कविर्तक लावले जातील, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

‘आताची स्थिती अशी आहे की, आम्हाला ज्यांच्याबरोबर जायचं (शिवसेना). आम्ही त्यांना प्रस्तावही दिलाय. पत्रकार परिषद घेऊन चर्चेची बाब जाहीर करूया. आता शिवसेनेनं ठरवायंच आहे की, जाहीर कधी करायचं? आता ते जाहीर होत नाही तोपर्यंत हे तर्कविर्तक लावले जात राहणार आहे’, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

Election : काँग्रेस, NCPने डाव टाकला! पण ठाकरेंचे हात रिकामाचे राहणार?

…तर शिंदेंसोबत चर्चा होऊ शकते -प्रकाश आंबेडकर

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींसाठी भेटीगाठी होणारच. पण, प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील, हा संबंध बांधला जातोय तो चुकीचा आहे. त्यांनी जर भाजपची साथ सोडली, तरच ही राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा होऊ शकत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT