अंधेरी पोटनिवडणूक : भाजप माघार घेणार? प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी आता शिंदे गटातूनच करण्यात आलीये. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केलीये. त्यामुळे आता भाजप माघार घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, […]
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी आता शिंदे गटातूनच करण्यात आलीये. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केलीये. त्यामुळे आता भाजप माघार घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘शिवसेनेचे आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनाने अंधेरी (पूर्व) भागात विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पोटनिवडणुकीत भाजप व आपल्या युतीचे उमेदवार त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.’
‘दुबईला रमेश लटके जेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत गेले होते. तेव्हा माझे मित्र व उद्योगपती राज शेट्टी यांच्याच हॉटेलमध्ये ते थांबले होते. दुर्दैवाने तिथे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. हे कळताच राज शेट्टी यांनी तेथे धाव घेतली आणि ताबडतोबत त्यांना वैद्यकीय मदत केली. परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झालेले. राज शेट्टी यांनी सर्वप्रथम दुबईवरून फोन करून ही घटना मला सांगितली, तेव्हा अक्षरशः धक्का बसला. काही सुचेना झाले. मी ताबडतोब आमदार सुनील राऊत व तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना ही घटना फोन करून कळवली. त्यानंतर राज शेट्टी यांनी दुबई सरकारचे अत्यंत खडतर असे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर मृतदेह विमानाने मुंबईत पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. आजही तो प्रसंग आठवला तर मनाला वेदना होतात.’
हे वाचलं का?
‘रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते विधानसभेत काम करताना मी, सुनील राऊत आणि रमेश लटके आम्ही तिघे अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसल्लत करायचो. रमेश लटके नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे. लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. शाखाप्रमुखापासून, नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता. मला आजही आठवते की, मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकेंनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम केला होता. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित होतात. मी देखील त्या कार्यक्रमास आपल्या समवेत उपस्थित होतो.’
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी दुर्दैवानं मृत्यूमुखी पडतो. तेव्हा आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध देण्याचा एक पायंडा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे त्यांचे मत मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी हीच भूमिका घेतली आहे. आपल्या युतीत ही जागा भाजपला गेली आहे. परंतु राज्याचे प्रमुख या नात्यानं आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे जतन होईलच, पण त्याच सोबत रमेश लटकेंना देखील वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT