हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक आणि एमआयएमचा अनुमोदक
Akola Politics : भाजप नेत्या अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव आहे. तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे एकमेव नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बाबतचे पुरावेही समोर आल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय समीकरणे नेमकी काय आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला काँग्रेसचा सूचक
भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवाराला एमआयएमचा अनुमोदक
Akola Politics : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपालिकेत बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीदरम्यान राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपकडून उपसभापती पदासाठी महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे यांचा नामनिर्देशित अर्ज दाखल करण्यात आला असून, या अर्जात काँग्रेसच्या नगरसेविकेचे नाव सूचक म्हणून तर एमआयएमच्या नगरसेवकाचे नाव अनुमोदक म्हणून असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजप नेत्या अनिता वाकोडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान यांचे नाव आहे. तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे एकमेव नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बाबतचे पुरावेही समोर आल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय समीकरणे नेमकी काय आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा : लग्नानंतर पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध, विरोध केल्यावर धमक्या आणि छळ; शेवटी पतीने स्वत:ला संपवलं
या घडामोडीनंतर हिवरखेड नगरपालिकेत वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रात काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांची नावे असल्याने राजकीय भूमिका आणि आघाड्यांबाबत चर्चा रंगू लागली आहे. या प्रकारामुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची शक्यता व्यक्त केली जात आहे.










