‘सरकार किती दिवस चालेल याची सर्वांनाच काळजी’; पृथ्वीराज चव्हाणांचं शिंदे-फडणवीस सरकारबद्दल विधान
वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्टनंतर महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला आणखी एक प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. टाटा एअरबस प्रोजेक्टवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या प्रोजेक्टवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर रवी राणा-बच्चू कडू वादावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलंय. टाटा एअरबस प्रोजेक्टच्या मुद्द्यावर पृथ्वीराज […]
ADVERTISEMENT
वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्टनंतर महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला आणखी एक प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. टाटा एअरबस प्रोजेक्टवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या प्रोजेक्टवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर रवी राणा-बच्चू कडू वादावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
टाटा एअरबस प्रोजेक्टच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प आला नाही, हे दुर्दैव आहे. टाटा एअरबस बद्दलचा प्रकल्पही गुजरातला जाणार, हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधानांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात, पण आता मोदी जे करत आहेत. ते दुर्दैवी आहे”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक्षेप हा तीव्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची राज्याची बाजू लंगडी पडत आहे. प्रकल्प देशात येतोय, याचं स्वागत केलं पाहिजे. पण यात पंतप्रधान किंवा जवळच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी एका राज्याच्या विरोधात हस्तक्षेप करणं उचित नाही. याबाबत सर्वपक्षीय बैठक घ्यावी”, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीये.
हे वाचलं का?
Tata Airbus Project : ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी’; अनिल देशमुखांचं नाव घेत भाजपचं टीकास्त्र
रवी राणा-बच्चू कडू आरोप-प्रत्यारोप; पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर ५० खोक्यांचा आरोप केलाय. या मुद्द्यावरून राणा-कडू आमने-सामने आलेत. राणांविरुद्ध बच्चू कडूंनी दंड थोपटलेत.
ADVERTISEMENT
या वादावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सरकारची अडचण आहे. सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाहीये. कुणा कुणाला काय काय आश्वासनं दिली होती. काय खोक्याची भाषा वापरली गेली होती. यातून सरकार परिपूर्णपणे काम करू शकत नाही.”
ADVERTISEMENT
यासाठीच मोदी-शाहांनी ईडीचा वापर करून कळसुत्री बाहुल्यांचं सरकार आणलं -नाना पटोले
“सरकारमध्ये तीव्र ओढाताण चाललेली आहे. हे काही महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचं नाहीये. त्यामुळे सरकार किती दिवस चालेल याची सर्वांनाच काळजी लागलीये. परंतु त्या अंतर्गत मतभेदामुळे, विरोधामुळे महाराष्ट्रातील प्रश्न सुटत नाहीयेत”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT