पुणे : चिथावणीखोर भाषणं! कालिचरण महाराज, मिलिंद एकबोटेंसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजासह मिलिंद एकबोटे आणि इतर सहाजणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील नातूबाग येथे 19 डिसेंबरला शिव प्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमात करण्यात आलेल्या भाषणांवर आक्षेप घेत कालिचरण महाराज, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटेंसह सहा जणांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा गांधींना शिविगाळ, नथुराम गोडसेचे आभार.. अकोल्याच्या कालिचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

हे वाचलं का?

समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालिचरण महाराज, कॅप्टन दिग्रेद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी नातूबाग येथे शिव प्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावणारे आणि धार्मिक श्रद्धांचा अवमान करून दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर भाषण मिलिंद एकबोटे यांनी केलं.

ADVERTISEMENT

त्याचबरोबर नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी देखील सूत्रसंचलन करताना भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषण केलं केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली होती.

ADVERTISEMENT

त्यावरून समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालिचरण महाराज, कॅप्टन दिग्रेद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशा सहा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचं खडक पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT