छत्तीसगडमधील वरिष्ठ अधिकाऱ्याचा नागपुरातील लॉजवर सापडला मृतदेह

मुंबई तक

नागपूर: छत्तीसगड सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याता नागपूरमधील पूजा लॉजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीवास्तव असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

नागपूर: छत्तीसगड सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याता नागपूरमधील पूजा लॉजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीवास्तव असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत होते.

राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसचिव (joint director) पदावर कार्यरत होते. काल (3 फेब्रुवारी) संध्याकाळी ते बराच वेळ रूमचा दार उघडत नसल्यामुळे लॉजच्या वेटरला शंका आली. त्यामुळे त्याने संध्याकाळी साडे सातच्या सुमारास लॉज मॅनेजरने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केले असता राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत त्यांना आढळून आले. यावेळी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री

दरम्यान, राजेश श्रीवास्तव हे 1 मार्चपासून बेपत्ता होते तेव्हापासून छत्तीसगड पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, काल त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास देखील सुरु केला आहे. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्याच केली की हा घातपात आहे यादृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?