Sanjay Raut : ‘…तेव्हा लोक त्यांच्याकडे अपेक्षेनं बघतील’; राष्ट्रपती होताच द्रौपदी मुर्मूंना आवाहन
देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी त्यांना संविधानाचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, प्रफुल्ल पटेलांची जप्त करण्यात आलेली संपत्ती आणि आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेबद्दलही भाष्य केलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत […]
ADVERTISEMENT

देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी त्यांना संविधानाचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, प्रफुल्ल पटेलांची जप्त करण्यात आलेली संपत्ती आणि आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेबद्दलही भाष्य केलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल राऊत म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याचा सर्वांनाच आनंद आहे. कारण तळागाळातून आलेली एक महिला राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा आहे.”
राष्ट्रपती निवडणुकीबद्दलचा शिंदेंचा दावा फोल; द्रौपदी मुर्मूंना महाराष्ट्रातून किती मतं मिळाली?
याच मुद्द्यावर राऊत म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या देशाच्या संविधानाच्या रखवालदार आहेत. देशाच्या घटनात्मक प्रमुख आहे. त्यामुळे या देशात घटनेची पायमल्ली होणार नाही. देशात कायद्याचं राज्य राहिल, याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कारण जेव्हा जेव्हा घटनेवर हल्ले होतील, तेव्हा देशातील नागरिक त्यांच्याकडे अपेक्षेनं बघतील,” असं राऊतांनी म्हटलं आहे.