शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवण्यात आली सुरक्षा

मुंबई तक

वसंत मोरे बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली असून बारामतीत दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समजतं आहे. उजनी धरणातील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वसंत मोरे

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली असून बारामतीत दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं समजतं आहे.

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आज (26 मे) या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानासमोर येत आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी 35 जण या आंदोलनासाठी बारामतीत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास स्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी उजनी संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील उपरी येथे सातारा रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp