Sharad Pawar आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ED चौकशीच्या ससेमिऱ्याचा मुद्दा चर्चेसाठी येण्याची शक्यता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता ही मिटींग होणार आहे. राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती कळतेय.

परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा हा मुद्दा या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ईडी चौकशीबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कंपनीवर ईडीने छापेमारी केली होती. ज्यावर शरद पवारांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही विरोधकांना शांत बसवण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचं वक्तव्य केलं होतं.

Shivsena माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचसोबत शरद पवारांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली. सत्तेत असलेले मित्रपक्ष राष्ट्रवादी नेत्यांची काम करत नाहीत अशी तक्रार या बैठकीत झाल्याचं कळतंय. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांमधले वाद-विवाद दूर करण्यासंबंधी चर्चा होण्याचे संकेत आहेत.

NCP च्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस विरोधात नाराजीचा सूर, नवाब मलिक म्हणाले…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT