Raj Kundra मुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ मॉडेलचे धक्कादायक आरोप
राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढण्याची चिन्हं आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी राज कुंद्राची मोडस ऑपरेंडी काय होती हे देखील सांगितलं तसंच राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शनही सांगितलं. सध्या या प्रकरणाची सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्येही प्रचंड चर्चा आहे. अशात आता या प्रकरणातल्या एका मॉडेलने समोर येऊन या […]
ADVERTISEMENT
राज कुंद्राला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढण्याची चिन्हं आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी राज कुंद्राची मोडस ऑपरेंडी काय होती हे देखील सांगितलं तसंच राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शनही सांगितलं. सध्या या प्रकरणाची सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्येही प्रचंड चर्चा आहे. अशात आता या प्रकरणातल्या एका मॉडेलने समोर येऊन या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राज कुंद्रा हाच यामागचा सूत्रधार आहे असं या मॉडेलने सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाची शिल्पा शेट्टीला म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीला काही माहिती होती का याचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात समोर आलेल्या मॉडेलने शिल्पा शेट्टीला या सगळ्या प्रकरणाची माहिती होती असं म्हटलं आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या मॉडेलचं नाव पूर्वी राज कुंद्राच्या याच प्रकरणात जोडलं गेलं होतं. या मॉडेलचा अश्लील चित्रपटांच्या उद्योगाशी संबंध आहे असंही बोललं जातं आहे. अशातच या मॉडेलने राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीला म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीला याबाबत सगळी माहिती होती असं म्हटलं आहे. शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या कंपनीत डायरेक्टर आहे असंही या मॉडेलने सांगितलं.
या मॉडेलने केलेल्या दाव्यानुसार कंपनीच्या डायरेक्टर्स आणि भागीदारांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावाचा समावेश आहे. ‘जेव्हा एखादी व्यक्ती कंपनीची डायरेक्टर होते तेव्हा तिला कंपनीत काय सुरू आहे याची कल्पना नसते असं कसं काय होईल? त्याचप्रमाणे राज कुंद्राच्या कंपनीची डायरेक्टर असलेल्या शिल्पा शेट्टीला या पॉर्न प्रकरणातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली पाहिजे तिला राजच्या पॉर्न फिल्म रॅकेटबाबत माहिती आहे’ असा दावा या मॉडेलने केला आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा व्हीडिओ
ADVERTISEMENT
राज कुंद्रावरही केले गंभीर आरोप
या मॉडेलने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. ‘एका व्हॉट्स अॅप व्हीडिओ कॉलवर माझ्याकडे वेब सीरिजमध्ये काम कऱण्यासाठी न्यूड ऑडिशनची मागणी करण्यात आली होती’ असाही आरोप या मॉडेलने केला आहे. या कॉलवर उमेश नावाचा व्यक्ती होता तसंच राज कुंद्राही होता या सर्वांनी माझ्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. राज कुंद्राने त्याचा चेहरा मास्कने झाकला होता पण मी त्याला ओळखलं असंही या मॉडेलने सांगितलं आहे. मी आत्तापर्यंत यासंदर्भात कुठे काहीही वाच्यता केली नव्हती. मात्र मुंबई पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं तर मी नक्की मदत करणार आहे असंही या मॉडेलने सांगितलं आहे. या मॉडेलने पॉर्न फिल्म प्रकरणाची माहिती शिल्पा शेट्टीला आहे असं म्हटल्याने आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT