सुशांत सिंहची हत्या, ‘त्या’ कर्मचार्‍याची दोन प्रश्नातच उडाली भंबेरी

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sushant Singh Rajput Death मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू होऊन जवळजवळ 2 वर्षे उलटली आहेत. पण त्याच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उघडकीस आलेले नाही आहे. याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकतच, मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमधील (Cooper Hospital) शवागाराच्या एका कर्मचाऱ्याने धक्कादायक माहिती उघड केली होतं. सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर, त्याचा खून झाल्याचा दावा या कर्माचाऱ्याने केला होता. अशा परिस्थितीत मुंबई तकने या कर्मचाऱ्याला काही प्रश्न विचारले असता त्याने यावर मौन पाळले. यावेळी अगदी दोनच प्रश्नात त्याची भंबेरीही उडाली. (sushant singhs death reason is not suicide its murder mortuary staff claim)

ADVERTISEMENT

Disha Salian Case : ‘त्या’ बातम्या खोट्या : दिशा सालियन प्रकरणात CBI चा मोठा खुलासा

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमधील शवागाराच्या या कर्मचाऱ्याचे नाव रूपकुमार शाह असे आहे. ते म्हणतात की, ‘जेव्हा मी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पाहिला तेव्हा ते आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून आले नाही. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. सुशांतची हाडे मोडली होती. त्याच्या पायाचे हाडही मोडले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर कोणतीतरी बुक्का मारला असेही वाटत होते. मी माझ्या वरिष्ठांकडे गेलो पण त्यांनी नंतर चर्चा करू असे सांगितले.’

हे वाचलं का?

सुशांतच्या मृत्यूविषयी सखोल प्रश्न, रूपकुमार शाहांचे मौन!

रूपकुमार शाह यांना सुशांतच्या मृत्यूसंबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले परंतु, त्यांना त्याची उत्तरं देता आली नाहीत. कुटुंबीयांनी पोस्टमार्टम रिपोर्टवर कोणतेही प्रश्न का उपस्थित केले नाहीत? तसेच, सुशांतचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांबद्दलही विचारले असता ते या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत.

सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर आजपर्यंत त्या फ्लॅटमध्ये दुसरा भाडेकरू का आला नाही?

ADVERTISEMENT

‘सुशांत सिंहची आत्महत्या नाही तर, खून आहे’: रूपकुमार शाह

अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच वर्षांनंतर रूपकुमार शाह नावाच्या व्यक्तीच्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का दिला आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टम झाले तेव्हा ते तिथे उपस्थित होते असा दावा रूपकुमार शाह यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 14 आणि 15 जून रोजी ड्युटीवर होते. त्याचवेळी एक व्हीआयपी बॉडी आली. त्यामुळे जास्त लोक आले. रात्री 11-12 च्या सुमारास सुशांतच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम नंबर आला. त्यावेळी त्यांना आढळले की, ही आत्महत्येची केस नाही.

ADVERTISEMENT

सुशांतच्या खूनाचा दावा करणारे रूपकुमार शाह दोन वर्षे गप्प का होते?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन वर्ष झालेली आहेत परंतु, दोन वर्षानंतर रूपकुमार शाह यांनी सुशांतचा खून झाला असे म्हटले. मग, दोन वर्षे ते गप्प का होते? असा प्रश्न विचारला असता ते गप्प राहिले. ते कोणतेही थेट उत्तर देऊ शकले नाहीत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT