दहशतवादी अफझल गुरूचा मृतदेह कुटुंबाला सोपवला नव्हता, मग याकूब मेमनचा मृतदेह का सोपवला?
१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. याकूब मेमनच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपने ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. भाजपने केलेल्या […]
ADVERTISEMENT
१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT
याकूब मेमनच्या कबरीवरून आरोप-प्रत्यारोप
याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपने ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. भाजपने केलेल्या आरोपांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपला मुळातच महागाई,बेरोजगारी हे मुद्दे सोडून याकूब मेमनच्या विषयावर राजकारण करायचं आहे असा पलटवार केलाय.. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण टोकाला पोचलं आहे.
हे वाचलं का?
याकूब मेमनच्या कबरीच्या प्रकरणानंतर आता यासंदर्भातील अनेक मुद्देही चर्चेत आले आहेत. दहशतवादी प्रकरणात पकडलेल्या अतिरेक्यांना फाशीनंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपुर्द केला जातो याकूब मेमनच्या प्रकरणातही तसंच झालं होतं. मात्र भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरूच्या फाशीनंतर त्याचा मृतदेह मात्र कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला नव्हता. नेमकं असं का घडलं?
ADVERTISEMENT
याकूब मेमनच्या फाशीनंतर काय घडलं होतं?
याकूब मेमन हा १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असल्याने ३० जुलै २०१५ ला त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात भल्या पहाटे फाशी देण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचं सरकार होतं. याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात यावा यासाठी याकूबचा भाऊ सुलेमान आणि त्याचा चुलतभाऊ उस्मान यांनी नागपूर जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. या अर्जावर तातडीची मंजुरी मिळून सकाळी ७ वाजता याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर जेल प्रशासनाने त्याचा आँटोप्सी रिपोर्ट मिळाल्यानंतर याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सुपुर्द करण्यात आला होता. याकूबच्या मृतदेहाचं दफन मुंबईतल्या मरीन लाईन्सच्या बडा कब्रिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी मोदी सरकारमध्ये आरे के सिंग हे केंद्रीय मंत्री होते.
ADVERTISEMENT
अफझल गुरूच्या फाशीनंतर काय घडलं?
आर के सिंग याचं नाव पुढे येण्यामागचं कारण म्हणजे हेच आर के सिंग अफजल गुरूच्या फाशीच्या वेळेस म्हणजेच २०१३ साली मनमोहन सिंग सरकारमध्ये होम सेक्रेटरी होते… अफजल गुरू हा १३ डिसेंबर २००१ साली झालेल्या संसदेवरील हल्ल्यातला मास्टरमाईंड होता. तब्बल १२ वर्षांनंतर ९ फेब्रुवारी २०१३ साली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या प्रकरणातही बारामुल्लाच्या डेप्युटी कमिशनरनी अफजल गुरूची बायको तब्बसुमतर्फे केंद्र सरकारला अफजल गुरूचा मृतदेह फाशीनंतर मिळावा यासाठी पत्र पाठवलं होतं. मात्र त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने ही परवानगी नाकारली होती.
अफझल गुरूच्या मृतदेहाचा तिहार जेलमध्येच अंत्यविधी
अफजल गुरूचा मृतदेह फाशीनंतर त्याच्या कुटुंबीयांना सुपुर्द केला आणि त्याचा दफनविधी खुलेआम करण्यात आला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि परिस्थिती गंभीर बनेल असं सांगत त्याचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यास परवानगी नाकारली होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की दहशवादी कारवायांमध्ये पकडलेल्या आरोपींना फाशी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह द्यायचा की नाही यावर आपल्याकडे कोणतंही धोरण ठरलेलं नाही. त्यामुळे याकूब मेमनच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाला किती महत्व द्यायचं आणि यावरून राजकारण करणं योग्य आहे की नाही हे आता तुम्ही ठरवायचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT