कशी असते बंजारा समाजाची परंपरागत होळी, पाहा हे खास फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

होळीचा सण हा संपूर्ण भारतवर्षात सप्तरंगांची उधळण करणारा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील बंजारा समाजाची लोकंही हा सण आपल्या पंरपरागत पद्धतीने साजरा करतात.

हे वाचलं का?

अकोला जिल्ह्यात बंजारा समाजातील तांड्यांवर सध्या होळीमुळे आल्हाददायक वातावरण आहे. आठवडाभर आधीपासून बंजारा समाजाचे बांधव आपल्या पारंपरिक वेशभुषेत होळी पेटवून त्यासमोर नृत्य करतात.

ADVERTISEMENT

मुळात बंजारा समाज महिनाभर होळी साजरी करतो. होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून त्यांच्या होळीला सुरुवात होते. याची लगबग या दिवसापासून बंजारा तांड्यांमध्ये होते ती बंजारा लोकगीतांनी. या गीतांना ‘लेंगीगीत’ असंही म्हटलं जातं. बंजारा समाजाचा होळी उत्सव जवळपास गुडीपाडव्यापर्यंत चालतो. होळीतील लेंगीगीतांच्या ठेक्यावर आबालवृद्ध अक्षरश: स्वत:चं वय विसरत बेभानपणे नाचतात.

ADVERTISEMENT

ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहेय अशी उपवर मुले होळीसाठी लाकडं जमा करतात… या उपवर मुलांना ‘गेरीया’ असं म्हटलं जातं.

मौखिक असणाऱ्या लेंगी गीतांमध्ये बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्तीचं महत्व सांगणारी गीतं असतात. सोबतच एखाद्याची खेचणारी वात्रटिकाही यात असतेय… बंजारा समाजाच्या होळीत ‘पाल’, ‘गेर’, ‘फगवा’, ‘धुंड’ अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात… होळीच्या दुसऱ्या दिवशीची रंगपंचमीच्या दिवशी बंजारा तांडा आनंदात हरवून गेलेला असतो. समाजातील महिला यादिवशी बंजारा लोकगीतं गात ‘फाग’ किंवा ‘फगवा’ मागतात. ‘फगवा’ किंवा ‘फाग’ म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने घेतलेले पैसे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT