Nitin Gadkari यांनी लिहिलेल्या पत्राबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, लेटर आप बहुत..
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राची बरीच चर्चा झाली होती कारण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवरा हे सांगणारंच हे पत्र होतं. मागच्या शनिवारी म्हणजेच 14 ऑगस्टला नितीन गडकरींनी हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. या पत्राबाबत उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर थोडं हलकंफुलकं आहे. नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते कस्तुरचंद […]
ADVERTISEMENT

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राची बरीच चर्चा झाली होती कारण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवरा हे सांगणारंच हे पत्र होतं. मागच्या शनिवारी म्हणजेच 14 ऑगस्टला नितीन गडकरींनी हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. या पत्राबाबत उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर थोडं हलकंफुलकं आहे. नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचं आणि फ्रीडम पार्कचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी दुश्य प्रणालीद्वारे संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री?
आप बाते बडी प्यारी करते हो, मगर लेटर बहोत सख्त लिखते हो. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गडकरींना उत्तर दिलंय तसंच ते पुढे म्हणाले की जरी हलक्या-फुलक्या मूडमध्ये म्हटलं असलं तरीही एक वचन नक्की देतो की विकासकामांच्या आड कुणीही येणार नाही. मी कुणालाही विकासकामांच्या आड येऊ देणार नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही तत्पर आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
नागपुरात अनोखं काही तरी आपण करतो आहोत. 20 मजली इमारत बनते आहे. स्पर्धा असली पाहिजे. विकासासाठी एकत्र येतो तेव्हा राजकीय जोडे काढून येतो. इतिहासाने ज्या कामाची नोंद घेतली त्याचं जतन करणं हे आपलं काम आहे. विकासाच्या मार्गात आपण स्पीड ब्रेकर येऊ देत नाही, असं सांगतानाच मेट्रोने नागपूरकरांचा प्रवास सुकर होईल. समृद्धी मार्गाने मोठा विकास होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.










