संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सोडणार मौन; अटकेवर काय बोलणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणात ईडीने अटक केली. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दुपारी पावणे दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी भांडुप येथील घरी जाऊन राऊतांच्या कुटुंबियांना धीर दिला.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबाची भेट

उद्धव ठाकरे हे भांडुप येथील संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी गेले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत हे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आई, त्यांच्या पत्नी आणि मुलींसोबत संवाद साधला.

‘शिवसेना आता संपण्याच्या वाटेवरच’;भाजपाध्यक्ष जेपी नड्डा कार्यकर्त्यांसमोर काय बोलले?

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा माघारी परतले. आता संजय राऊत यांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या दृष्टीने ईडीकडून तपास सुरू आहे. याच प्रकरणात संजय राऊतांची चौकशी ईडीकडून करण्यात आली. १ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर ईडीने २० जुलै आणि २७ जुलै रोजी ईडीने नोटीस दिली होती. मात्र, चौकशीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर ईडीचं पथक रविवारी (३१ जुलै) संजय राऊत यांच्या घरी पोहोचलं होतं.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे सगळं तर…”

ADVERTISEMENT

रविवारी ईडीच्या पथकाने त्यांची ९ ते १० तास चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. मध्यरात्री १२.४० वाजता ईडीने संजय राऊत यांना अटक केली. आज त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT