मोदी सरकार बजेटमधून बांधणार निवडणुकीचा हायवे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या कारकीर्दीतला ३ केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाचं संकट आल्यापासून सीतारामन यांनी आतापर्यंत ५ छोटेछोटे मिनी बजेट सादर करत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. या पार्श्वभूमीवरच यंदा केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प खास ठरतोय. यंदाच्या बजेटमध्येही सरकारनं काही घोषणा केल्यात. या घोषणांचं इलेक्शनशी कनेक्शन जोडलं जातंय. सत्ताधारी भाजपने […]
ADVERTISEMENT

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या कारकीर्दीतला ३ केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाचं संकट आल्यापासून सीतारामन यांनी आतापर्यंत ५ छोटेछोटे मिनी बजेट सादर करत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. या पार्श्वभूमीवरच यंदा केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प खास ठरतोय. यंदाच्या बजेटमध्येही सरकारनं काही घोषणा केल्यात. या घोषणांचं इलेक्शनशी कनेक्शन जोडलं जातंय.
सत्ताधारी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मिशन बंगालची सुरवात केलीय. या मिशन बंगालचं कनेक्शन आपल्याला बजेटच्या घोषणांमध्येही दिसतात. बजेट भाषणाच्या सुरवातीलाच निर्मला सीतारामन यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतल्या पंक्तींचा उल्लेख केला.
बजेटमध्ये सरकारने पश्चिम बंगालमध्ये हायवेच्या बांधणीसाठी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची घोषणा केलीय. तसंच आसामसाठी ३४ हजार कोटी दिले जाणार आहेत. पुढच्या ३ वर्षांत हायवे बांधणीचं हे काम पूर्ण करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलीय. तसंच तामिळनाडूत रस्ते बांधणी आणि इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय.