पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! राणीची बाग १ नोव्हेंबरपासून खुली होणार
कोरोना काळात बंद असलेलं मुंबईतलं वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी राणीची बाग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू कोविडचा अद्याप न टळलेला धोका लक्षात घेता राणीच्या बागेतील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्राणी संग्रहालयातील तिकीट खिडकी […]
ADVERTISEMENT
कोरोना काळात बंद असलेलं मुंबईतलं वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी राणीची बाग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
परंतू कोविडचा अद्याप न टळलेला धोका लक्षात घेता राणीच्या बागेतील नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्राणी संग्रहालयातील तिकीट खिडकी संध्याकाळी सव्वा पाच ऐवजी ४ वाजता बंद होणार आहे. दिवसभरात किंवा सुट्टीच्या दिवशी कोणत्याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्ये जास्त प्रमाणात गर्दी झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कोविड सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.
कोविड-१९ च्या काळात नागरिकांनी घ्यावयाची दक्षता –
हे वाचलं का?
१) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, तिकिट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल.
२) प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल.
ADVERTISEMENT
३) कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव / संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षाखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्यावी.
ADVERTISEMENT
४) कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे, गर्दी करू नये. दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
५) प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत-कमी साहित्य आणावे. साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
६) प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) सुविधेचा उपयोग केल्यानंतरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
७) प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने / समुहाने फिरू नये. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
८) कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
९) प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा.
१०) एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱयाच्या डब्यात टाकावे.
११) कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयातील जवळपासच्या सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा.
१२) कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.
१३) प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर प्रसाधनगृहातील साबण द्रावणाचा (लिक्वीड सोप) उपयोग करावा.
या सर्व निर्देशांचे पर्यटकांनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT