Vidhan Parishad Election- आमच्यातली एकजूट संध्याकाळी दिसेल, संजय राऊत यांचा दावा
महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसून येईलच असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विधान परिषदेची निवडणूक आज पार पडते आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच सामना आजही रंगतोय. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसून येईलच असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. विधान परिषदेची निवडणूक आज पार पडते आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असाच सामना आजही रंगतोय. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे हातात हात घालून चालत आहेत. आम्हाला धोका आहे आणि समोरच्यांना धोका नाही का? आमचं काय ठरलं आणि काय नाही ठरलं हे मी आत्ता सांगणार नाही. आमच्या पक्षातली एकजूट तुम्हाला दिसून येईलच
गावकडल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार?: संजय राऊत