LIVE- राज्यसभेची निवडणूक होणारच, कुणीही प्रस्ताव घ्या कुणी समजून घ्याची वेळ संपली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्रजी आणि मी एक तासभर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेची तिसरी जागा मागे घ्या आम्ही विधान परिषदेची एक जागा तुम्हाला जास्त देऊन आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठी ची दुसरी जागा मागे घ्या आणि विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही त्यानंतर कुठलाच संवाद माहाविकास आघाडीकडून झाला नाही.वेगळ्या बातम्या कानावर येत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

ADVERTISEMENT

शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. कुणी प्रस्ताव घ्या कुणी समजून घ्या ही सकाळपासून सुरू असलेली खेळी निष्प्रभ ठरली आहे. आज सकाळी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची सायंकाळी 6 वाजता वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेस एनसीपी नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत. राज्यसभेची निवडणूक अटळ आहे हाच या सगळ्याचा अर्थ निघतो आहे. बाळासाहेब थोरात यांनीही ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

भाजपच्या नेत्यांशी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की भाजप आता माघार घेणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होईल असं वाटलं होतं. मात्र तसं होणार नाही असं भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मुंबई तकसोबत चर्चा केली. आमचा पर्याय मान्य केला नाही तर आम्ही तीन जागा लढवणार आहोत. तीन जागा लढवण्याच्या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. राजकारणात चमत्कार घडू शकतो असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेले आहेत. कारण राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार का? याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी गेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित आहेत. या सगळ्या चर्चेतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्या भेटीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. मात्र या प्रस्तावावर काय होणार हे अद्याप ठरलेलं नाही.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीकरडून प्रयत्न सुरू आहेत. आज महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं होतं. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आल्याचं कळतं आहे.

या भेटीत नेमकं काय झालं याची माहिती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते; संजय राऊतांनी केलं कौतुक

महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे.

“आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे…”; राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपाने स्पष्ट केली भूमिका

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT